नगरमध्ये युवकावर चौघांनी केला कोयत्याने हल्ला

0
52

नगर – मागील भांडणाची कुरापत काढुन युवकावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. सनी संतोष भुजबळ (वय २१, रा. दातरंगे मळा) असे हल्ला झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण मारूतीराव माळी, अमित चित्राल, सचिन ठाणगे, प्रशांत भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरूवारी (दि.८) दुपारी बाराच्या सुमारास हराळ हॉस्पिटलच्या समोर ही घटना घडली. किरण माळी याने माझ्याकडे काय पाहतो, असे म्हणून कोयत्याने हातावर मारहाण करून जखमी केले. तसेच सचिन ठाणगे, प्रशांत भोसले, अमित चित्राल यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करून तु आमच्यात फिरला नाही तर तुला बघून घेतो, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.