सध्याची परिस्थिती पाहता अराजकता दिसून येते

0
63

आम आदमी पार्टीचा वकील आंदोलनास पाठिंबा

नगर – सध्या महाराष्ट ्र राज्याची परिस्थिती ही बिहार सारखी दिसून येते. कायद्याचे भय, भीती गुन्हेगारांना राहिली नाही. सगळीकडेच अराजकता दिसून येते. शासकीय अधिकारी, डॉटर्स आणि आता न्याय देण्यासाठी कार्यरत असणार्‍या वकिलांवर प्राण घातक हल्ले होत आहे. राहुरीमध्ये अ‍ॅड. राजाराम आढाव व अ‍ॅड. मनीषा आढाव या पती-पत्नी विधीज्ञांचे अपहरण करून निर्घृण खून करण्यात आला. ही अतिशय निंदनीय घटना असल्याचे प्रतिपादन आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजू आघाव यांनी केले. आम आदमी पार्टीच्या वतीने अहमदनगर शहर वकील संघटनेच्या वतीने सुरु असलेल्या आंदोलनास पाठिंबा देऊन वकील संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी आघाव बोलत होते. यावेळी आपचे शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ, जिल्हा समन्वयक प्रा. अशोक डोंगरे, महिला आघाडी अध्यक्षा अ‍ॅड. विद्या शिंदे, इंजि. प्रकाश फराटे, नामदेव ढाकणे, सुहासराव सोनवणे, अ‍ॅड. महेश शिंदे, पोपट बनकर, माहेर संस्थेच्या अध्यक्षा रजनीताई ताठे आदींच्या शिष्टमंडळाने शहर बारचे सदस्या अ‍ॅड. अनिता दिघे व रवींद्र शितोळे यांच्याकडे पाठिंबाचे पत्र दिले. प्रा. अशोक डोंगरे म्हणाले की, वकील संरक्षण कायदा होणे गरजेचे आहे.

विधीज्ञ आढाव दांपत्यांचा खटला जलदगती न्यायालयात चालविला जावा जेणेकरून लवकर न्याय मिळेल. सदर खटला विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नेमणूक केली जावी, या मागण्यासाठी आम आदमी पार्टी जिल्ह्यातील सर्व वकील बांधवांसोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुहासराव सोनवणे यांनी न्यायालयीन प्रक्रिया बळकट करण्यासाठी वकील संरक्षण कायदा करणे आवश्यक आहे. वकील संरक्षण कायद्यामुळे सर्वच वकील बांधवांना निर्भीडपणे न्यायालयीन प्रक्रिया राबविताना अडथळे येणार नाहीत. संपूर्ण महाराष्ट ्रातील वकील बांधवांसाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वकील संरक्षण कायद्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी अ‍ॅड. अनुराधा येवले, अ‍ॅड. प्रज्ञा उजागरे, अ‍ॅड. गौरी सामलेटी, अ‍ॅड. करुणा शिंदे, अ‍ॅड. गीता, अ‍ॅड. धनलक्ष्मी, अ‍ॅड. स्विटी माळवदे, अ‍ॅड. अमित पाटील आदी उपस्थित होते. तसेच आपच्या वतीने वकील संरक्षण कायदा लागू करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांना देण्यात आले.