नगर – वेळेत उपचार व निदान झाल्यास कॅन्सर बरा होतो. कॅन्सरचे यो१/२य वेळी निदान व उपचार होणे आवश्यक आहे. कॅन्सर झाल्यास घाबरुन न जाता त्याचा सामना करुन त्या आजारातून बाहेर पडण्याचे डॉ. सतीश सोनवणे यांनी आवाहन केले. समाजात कर्करोगाची जनजागृती होण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल, जायंट२स ग्रुप ऑफ अहमदनगर व मॅक केअर हॉस्पिटलच्या संयुे विद्यमाने कर्करोग जनजागृती सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलमध्ये झालेल्या कार्यक्रमात महिलांची आरो१/२य तपासणी करुन गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले. तर कर्करोगाबद्दल माहिती देण्यात आली. महापालिकेचे अतिरिे आयुे डॉ. प्रदीप पठारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी उपायुे अजित निकज, डॉ. सतीश राजुरकर, डॉ. तेजश्री जुनागडे, डॉ. अमित करडे, डॉ. सतीश सोनवणे, नम्रता मकासरे, जायंट२स वेल्फेअरचे सदस्य संजय गुगळे, डॉ. गणेश बडे,जायंट२स ग्रुपचे अध्यक्ष पूजा पातुरकर, यतीमखानाचे सचिव फारुक शेख, दीपक मुथा, अभय मुथा, अनिल गांधी आदींसह महिला व मुली उपस्थित होत्या. डॉ. तेजश्री जुनागडे यांनी ब्रेस्ट कॅन्सर वरील लक्षणे व उपचार यावर महिलांनी घ्यावयाची काळजी याबाबत आपले मनोगत व्ये केले.
महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल, जायंट्स ग्रुप व मॅक केअर हॉस्पिटलचा संयुक्त उपक्रम
डॉ. अमित करडे यांनी गर्भपिशवीचा कॅन्सर व लसीकरण यासंबंधी माहिती दिली. नम्रता मकासरे यांनी निरोगी आरो१/२यासाठी आहार, व्यायाम व जीवनशैलीस सुधारणा करण्याबाबत मार्गदर्शन केले. संजय गुगळे म्हणाले की, कॅन्सर रोगामुळे भारतात अनेकांचे बळी जात आहेत, वेळेवर निदान व उपचार न झाल्याने बरा होणारा कॅन्सर जीवघेणा बनला आहे. रु१/२णांनी वेळोवेळी तपासणी करून उपचार घेणे आवश्यक आहे. जायंट२सच्या माध्यमातून कॅन्सरबद्दल जनजागृती या सप्ताहाद्वारे केली जाणार असल्याचे सांगून जायंट२स ग्रुपच्या सामाजिक कार्याची त्यांनी माहिती दिली. स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. गणेश बडे, डॉ. अमित करडे यांनी गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरणाचे संच बाळासाहेब देशपांडे दवाखान्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश राजुरकर यांच्याकडे सुपूर्द केले. तर कै.बाळासाहेब देशपांडे दवाखाना मधील गरोदर मातांना जायंट२स ग्रुपच्या वतीने प्रोटीन सप्लीमेंट डब्यांचे व यतीमखाना मधील मुलींना ड ्रायफ्रूटचे वाटप करण्यात आले. स्वागत व सूत्रसंचालन डॉ. दीपमाला चव्हाण यांनी केले. प्रास्ताविक डॉ. वृषाली पाटील यांनी केले. आभार डॉ. सतीश राजुरकर यांनी मानले.