मोबाईलच्या युगात अडकलेल्या मुलांना सर्जनशीलतेचा कलेमधून प्रोत्साहन देण्याची गरज : अर्पिता रणनवरे

0
81

कर्नल परब स्कूलमध्ये कला आणि हस्तकला प्रदर्शन

नगर – मोबाईलच्या युगात अडकलेल्या मुलांच्या सर्जनशीलतेला कलेतून प्रोत्साहन देण्याची गरज आहे. कला आविष्कारातून समाधानाची जाणीव निर्माण होत असते. प्रत्येक विद्यार्थीमध्ये वेगवेगळी क्षमता असून, ती ओळखून त्या दिशेने प्रोत्साहन देण्याची गरज आहे. विद्याथ्यारच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी कला आणि हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन केले जात असल्याचे मुख्याध्यापिका अर्पिता रणनवरे यांनी सांगितले. विद्याथ्यारच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी कर्नल परब स्कूलमध्ये कला आणि हस्तकला प्रदर्शन उत्साहात पार पडले. या प्रदर्शनात विद्याथ्यारनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून त्यांनी तयार केलेल्या कलाकृती मांडण्यात आल्या होत्या. यामध्ये विद्याथ्यारनी स्वत: तयार केलेल्या पतंगावर आकर्षक कलाकृती, विविध हस्तकौशल्याच्या वस्तू, व्येीचित्र, निसर्ग चित्रांचा समावेश होता. विद्याथ्यारची उत्कृष्ट कलाकृती पाहून पाहुण्यांसह पालक देखील अवाक झाले. या प्रदर्शनात विद्याथ्यारनी सिटी हॉल, सर्कस, इसरो, हवा महल, थ्रेड आर्ट, पेन्सिल स्केच, वॉटर कलर स्केच, बटन आर्टचे प्रकल्प प्रदर्शनात मांडले होते. या प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी कर्नल परब स्कूलच्या सीईओ गीता परब, संचालक कर्नल दिलीप परब, रिकी राज परब, मुख्याध्यापिका अर्पिता रणवरे, सनबीम्स प्री-प्रायमरी शाळेच्या मुख्याध्यापिका भावना शिंगवी आदींसह कर्नल परब व सनबीम्सच्या सर्व शिक्षका उपस्थित होत्या. विद्याथ्यारनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रदर्शनात मांडलेल्या कलाकृती पाहण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती.