आ. रोहित पवार यांच्या ईडी चौकशीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरमध्ये ‘घंटानाद’ आंदोलन

0
43

आमदार रोहित पवार यांच्यावर ईडी मार्फत होणार्‍या चौकशीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालय येथे घंटानात आंदोलन करून निषेध नोंदवताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते

नगर – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर ईडी मार्फत होणार्‍या चौकशीच्या निषेधार्थ नगर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे घंटानात आंदोलन करून निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना निवेदन देत निषेध व्यक्त नोंदविण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शहर जिल्हा अध्यक्ष अभिषेक कळमकर, जिल्हा उपाध्यक्ष किसनराव लोटके, सिताराम काकडे, नगर तालुका अध्यक्ष रोहिदास कर्डिले, प्रकाश पोटे, फारूक रंगरेज, अरीफ पटेल,केशवराव बेरड, नलिनी गायकवाड, प्रकाश फिरोदिया, रविंद्र गावडे, भाऊसाहेब उडाणशिवे, आसाराम कावरे, निलेश मालपाणी, पापामिया पटेल, रघुनाथ झिने, भास्करराव मगर, सचिन ढवळे, मुकेश झोडगे, अनंत गारदे, जरीना पठाण, भिमराज कराळे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट फुटून सरकारमध्ये सामील झाला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत लढत आहे. आणि त्यातील एक आमदार रोहित पवार हे आहे ते शरद पवार यांच्या बाजूने खंबीरपणे उभे असून शिव, शाहू, फुले, आंबेडकरांची पुरोगामी विचारधारा पवार यांच्यावर निष्ठा ठेवून त्यांनी फुटीर गटाविरोधात राज्यभरात रान पेटवले आहे. आणि राज्यातील सामान्य नागरिक, विद्यार्थी, युवा, शेतकरी, महिला यांच्या मुद्द्यावरही ते सरकारला कोंडीत पकडण्याचे काम करत आहे. केवळ आपल्या मतदारसंघापूरतेच मुद्दे ते मांडत नाही तर राज्यातील विविध घटकांचे मुद्दे ते आक्रमकपणे मांडत आहे. आमदार म्हणून विधानसभेत आणि रस्त्यावरची लढाई ही आमदार रोहित पवार हे लढत असल्याने दिसत आहे. त्यामुळेच घाबरलेल्या सरकारने त्यांच्या मागे आता चौकशीचा ससेमीरा लावला आहे. यापूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईचा बडगा उभारून पहिला तरी रोहित पवार यांनी या कारवाईला जुमानले नाही. त्यानंतर युवा संघर्ष यात्रा काढून राज्यभर सरकार विरोधात वातावरण निर्मिती केली. त्यामुळे लोकांचे प्रश्न मांडणार्‍या या युवा नेत्याला रोखण्यासाठी सरकारकडून सुडाची कारवाई केली जात असून ईडीच्या चौकशीचा ससेमीरा त्यांच्यामागे लावला आहे. लोकशाहीमध्ये लोकांचे प्रश्न मांडणार्‍या नेत्याविरोधात कारवाई केली जात असेल आणि त्याचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर हे धोकादायक आहे. असा आरोप यावेळी करण्यात आला. रोहित पवार लढतील अन जिंकतील : अभिषेक कळमकर राज्य बँकेकडून बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणात आमदार रोहित पवार यांचा दुराव्यानेही संबंध नाही शिवाय २०१९ मध्ये ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासात कोणतेही बेकायदेशीर व्यवहार झाला नसल्याचे स्पष्ट झाले असून तपास ही बंद करण्यात आला आहे. परंतु केवळ त्रास देण्याच्या हेतूने या सरकारकडून आमदार रोहित पवार यांची चौकशी करत असून लोकांचे प्रश्न विचारणार्‍याला जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचे अभिषेक कळमकर म्हणाले. रोहित पवार हे शरद पवारांच्या तालमीतील प्रॉडट आहे, त्यांची मशागत गोविंदबागेतली. ती काय सागर किंवा देवगिरी बंगल्याची नाही की ते ह्या कारवाईला घाबरतील. त्यामुळे ते लढतील आणि जिंकतील असा विश्वासही कळमकर यांनी व्यक्त केला.