एमआयडीसी परिसरात कोयता व तलवार घेवून दहशत करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी पकडले

0
22

नगर – एमआयडीसी परीसरात दोन वेगवेगळया ठिकाणी धारदार कोयता व तलवार हातात घेवून मोठमोठ्याने ओरडुन दहशत निर्माण करणार्‍या दोघा इसमांना एमआयडीसी पोलीसांनी पकडले आहे. त्यांच्या कडून हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. नरेश शिरीष रणदिवे (वय २१, रा. माळवाडी चौक, वडगाव गुप्ता, ता. नगर) व सोमनाथ राजु केदारे (वय २१, रा.गांधीनगर, बोल्हेगाव) अशी या दोघांची नावे आहेत. एमआयडीसी स.पो.नि. माणिक चौधरी यांना माळवाडी चौक, वडगाव गुप्ता येथे एक इसम हातात धारदार कोयता बाळगुन मोठमोठ्याने ओरडुन दहशत निर्माण करत आहे. अशी माहिती मिळाली. त्यांनी तातडीने पथक पाठवून आरोपी नरेश रणदिवे यास पाठलाग करून पकडले. त्यानंतर सहयाद्री चौक येथे एक इसम हातामध्ये धारदार तलवार घेवून लोकांमध्ये दहशत निर्माण करत आहे अशी माहिती मिळाली. तेथेही तातडीने पोलिस पथक गेले व त्यांनी सोमनाथ केदारे यास पकडले.

या दोघांच्या विरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (३) (१), ११०/११७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई स.पो.नि. माणिक चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिपक पाठक, योगेश चाहेर, पो.हे.कॉ. नंदकुमार सांगळे, राजपुत, पो.ना. विष्णु भागवत, पो.कॉ.किशोर जाधव, सुरज देशमुख, नवनाथ दहिफळे, सानप, मोबाईल सेलचे राहुल गुंडु यांचे पथकाने केली आहे.