खेळातून युवकांमध्ये एकसंघाची भावना निर्माण होते

0
19

आ. संग्राम जगताप यांचे प्रतिपादन; केडगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

केडगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन चेंडू टोलवून करताना आ. संग्राम जगताप.

नगर – खेळातून युवकांमध्ये एक संघाची भावना निर्माण होते. डीजेमुळे युवक मोठ्या प्रमाणात एकत्र येतात. मात्र त्यातून ओळख निर्माण होत नाही व विचारांची देवाण-घेवाण होत नाही. खेळातून युवक एकत्र आल्यास नवीन विचारांना चालना मिळत असल्याचे सांगून, स्पर्धेत सातत्य ठेवण्याचे आ. संग्राम जगताप यांनी आवाहन केले. केडगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. केडगाव, लोंढे मळा येथे रात्री फ्लड लाईटमध्ये प्लास्टिक बॉलवर क्रिकेट स्पर्धा रंगत आहे. यामध्ये खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग लाभला असून, शहर व उपनगरातील अनेक संघांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी विशाल गणेश मंदिराचे विश्वस्त प्रा. माणिक विधाते, सुमती कोठारी, माजी नगरसेवक संजय लोंढे, नगरसेवक मनोज कोतकर, उद्योजक जालिंदर कोतकर, बापूसाहेब सातपुते, गणेश जाधव, अनिल ठुबे, ह.भ.प. शिंदे महाराज, मच्छिंद्र जाधव, डॉ. प्रशांत जाधव, डॉ. बलराज पाटील, दत्ता विधाते, परमेश्वर विधाते, रवी टकले, माऊली जाधव, नवनाथ घेंबूड, दत्तात्रय कोतकर, विशाल धोंडे, शुभम लोंढे, विकी हुरुळे, ओंकार कापरे, सचिन घेंबूड, अजित कोतकर, तुकाराम कोतकर, गणेश लोंढे, रवी कराळे, दत्ता गिरमे, अनिकेत लोंढे, किशोर जेऊरकर, उमेश ठोंबरे, मनोज घेंबूड, राजेंद्र गुंड, मंगेश लोंढे, रामदास काकडे, आयोजक भरत ठुबे, सोन्याबापू घेंबुड, सुमित लोंढे, अमोल ठूबे अजित ठुबे आदींसह खेळाडू व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रा. माणिक विधाते यांनी युवकांनी पुढाकार घेऊन घेतलेल्या स्पर्धेचे कौतुक केले. गेल्या तीन वर्षांपासून केडगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी प्रथम विजेत्यास ३३ हजार ३३३ रुपये, द्वितीय विजेत्यास २२ हजार २२२ रुपये व तृतीय विजेत्यास १५ हजार ५५५ रुपयाचे रोख बक्षिस व स्मृतीचिन्ह देण्यात येणार असल्याची माहिती भरत ठुबे, सोन्याबापू घेंबुड व सुमित लोंढे यांनी दिली. आयोजन समितीच्या वतीने सुनील गुंड यांनी आभार मानले.