‘फुडीज मेला २०२४ ला नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
40

नगर बदलतंय आयोजित ’फुडीज मेला-२०२४ चे उद्घाटन करताना उद्योगपती नरेंद्र फिरोदिया, मनपाचे अग्निशमन दलाचे प्रमुख शंकर मिसाळ

नगर – नगरमध्ये नगर बदलतंय आणि रोटरी लब ऑफ अहमदनगर मिडटाउन आयोजित फुडीज मेला २०२४ ला पहिल्याच दिवशी नगरकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. फुडीज मेलामध्ये महाराष्ट्रातून वेगवेगळे पदार्थ नगरकरांच्या मेजवानीसाठी आलेले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योगपती नरेंद्र फिरोदिया व मनपाचे अग्निशमन दलाचे प्रमुख शंकर मिसाळ यांच्या हस्ते झाले. त्यांनीही या उपक्रमाचे विशेष कौतुक करत नगरकरांना अशा मेजवानी वारंवार अनुभवास मिळाव्यात अशी आशा व्यक्त केली. या प्रसंगी किरण वर्पे, संजय गाडेकर, आशिष संकलेचा, केशवकुमार काळे, टीना इंगळे, डॉ. अमित पवार, डॉ. सुलभा पवार, प्रा. तुषार अंबाडे, अभिषेक शेलार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उदघाटन प्रसंगी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम जागो हिंदुस्थानीमध्ये प्रसिद्ध गायक अजित वधवा यांच्या टीमने विविध गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमास सुरभी हॉस्पिटलचे विशेष सहकार्य लाभले. या फूड फेस्टिवलला महाराष्ट्रातील कोल्हापूर, धुळे, शेगाव, नाशिक, बारामती, पुणे अशा विविध जिल्ह्यातून नाविन्यपूर्ण स्टॉल्स उपलब्ध आहे अशी माहिती नगर बदलतंयचे धनेश खाती आणि भूषण ओस्तवाल यांनी दिली. नगरकरांना २७ आणि २८ जानेवारी रोजी या मेजवानीचा आनंद घेता येणार असून २७ जानेवारी रोजी आर जे प्रसन्नाच्या चालता बोलता या शोमध्ये सोन्याची नथ, पैठणी आणि अनेक बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. तसेच २८ जानेवारी रोजी ये शाम मस्तानी हा जुन्या नव्या हिंदी मराठी गीतांची सुरेल मैफल रंगणार आहे. तरी नगरकरांनी २७ आणि २८ जानेवारी रोजी या फूड फेस्टिव्हला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन रोटरी लब अध्यक्ष मधुरा झावरे यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत नगर बदलतंयचे किरण गवते यांनी केले आणि आभार रोटरी लब ऑफ मिडटाऊनचे सेक्रेटरी अमोल खोले यांनी मानले व सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले