किल्ल्याजवळून महिलेच्या गळ्यातील ‘मिनीगंठण’ चोरट्याने हिसकावले

0
61

नगरहून भिंगारकडे चाललेल्या महिलेच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनीगंठण अनोळखी चोरट्याने हिसका मारून तोडून पळवून नेल्याची घटना भुईकोट किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोर बुधवारी (दि. २४) दुपारी १.१५ च्या सुमारास घडली. याबाबत धनश्री नंदकुमार सोनकांबळे (रा. यशवंत नगर, केकती, ता.नगर) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आपण भिंगारकडे येत असताना नगर – पाथर्डी रोडवर भुईकोट किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोर पाठीमागून आलेल्या अनोळखी चोरट्याने आपल्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनीगंठण हिसका मारून तोडून पळवून नेल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं.वि. कलम ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.