सर्वधर्मीय नागरिकांच्या हस्ते श्रीराम मूर्तीचे पूजन

0
43

शिववरद प्रतिष्ठानचा सामाजिक समरसतेचा उपक्रम

नगर – अयोध्येत श्रीराम मंदिर उद२घाटन व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त आनंदीबाजार येथील शिववरद प्रतिष्ठानच्या वतीने परिसरात आकर्षक सजावट करून भव्य श्रीराम मूर्ती उभारण्यात आली होती. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा झाल्यावर येथे उपस्थित भाविकांनी जय श्रीराम… जय श्रीराम… च्या घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला. श्रीरामाच्या मूर्तीचे सर्वधर्मीय नागरिकांच्या हस्ते पूजन व आरती करून सामाजिक समरसतेचा उपक्रम राबविण्यात आला. माजी नगरसेवक किशोर डागवाले यांच्या संकल्पनेतून झालेल्या या कार्यक्रमात कारसेवक अंबादास पंधाडे, भालचंद्र सावेडकर, ज्ञानेश्वरी भंडारी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी झालेल्या हिंदवी शौर्य ढोल पथकाच्या सादरीकरणात किशोर डागवाले यांनीही ढोल वाजवण्याचा आनंद घेतला. किशोर डागवाले म्हणाले, ५०० वषारच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अयोध्येत श्रीराम मंदिर पुन्हा उभारण्यात आले आहे. या सोहळ्याचे आपण साक्षीदार आहोत हे आपले भाग्य आहे. माझे गुरु अंबादास पंधाडे हे १९९० साली आपल्या जीवाची पर्वा न करता अयोध्येत कारसेवा करण्यासाठी गेले होते. त्यांच्यासह इतर कारसेवकांचा आज सन्मान करताना मला आनंद होत आहे.

श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना निमित्त सर्वत्र भगवे व राममय वातावरण निर्माण झाले आहे. शिववरद प्रतिष्ठानच्या या आनंदोत्सवात सर्वधर्मीय नागरिकांनाही सामावून घेतले आहे. यावेळी सुनील सूर्यवंशी, सागर गोरे, रोहन डागवाले, नितीन डागवाले, हाजी हिदू खान, किरण तापकीर, संदीप नामदास, महेश कुलकर्णी, कादिर बाबा, अब्बास शेख, आशा डागवाले, तेजस्वीनी भंडारे, मोहिनी रासने, आरती सांगळे, शहर भाजपाचे ज्ञानेश्वर काळे, बाबासाहेब सानप, विणा कोडम, स्वाती गोडळकर, रुपाली गणगले, प्रांजल डागवाले, सविता डागवाले, चित्रा जाधव, रीचीता गवळी, संगीता भोसले, प्रमिला टकले आदींसह भाविक उपस्थित होते.