भरदिवसा घर फोडून दागिने पळविले

0
21

नगर – दुकानदाराचे बंद असलेले घर भरदिवसा फोडून चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना नगर तालुयातील गुंडेगाव गावात शुक्रवारी (दि.१९) दुपारी १.३० ते २.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबत निखील बाळासाहेब जाधव (रा. गुंडेगाव, ता.नगर) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात शनिवारी (दि.२०) फिर्याद दिली आहे. फिर्यादी जाधव हे शेतकरी असून त्यांचे गावात स्टेशनरीचे दुकान आहे. शुक्रवारी दुपारी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व घरात उचकापाचक करत कपाटात ठेवलेले ३२ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या – चांदीचे दागिने चोरून नेले. ते घरी आल्यावर त्यांना घरात चोरी झाल्याचे समजले. त्यानंतर फिर्यादी गायकवाड यांनी नगर तालुका पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. जाधव यांच्या फिर्यादीवरून भा. दं. वि. कलम ४५४, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.