एमआयडीसी उद्योग ग्रुप-स्नेह ७५ ने केला कारसेवकांचा सन्मान
नगर – केवळ प्रभु श्रीरामांप्रती असलेली आस्था, श्रद्धा महत्वाची होती, आयोध्याम ध्ये श्रीराम मंदिर व्हावे यासाठी १९९० च्या दशकात दोन वेळा कारसेवा झाल्या, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, अशोक सिंघल, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने देशभरातील राष्ट ्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, विश्वहिंदू परिषदेचे कार्यकर्ते, कारसेवकांच्या अथक परिश्रमामुळे आज आयोध्येत श्रीराम मंदिर उभे राहिले. हाच जीवनातील मोठा आनंद आम्ही मानतो, असे प्रतिपादन प्रा. मधुसूदन मुळे यांनी केले. आयोध्या येथे प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नगरमधील कारसेवकांचा एमआयडीसी उद्योग ग्रुप व स्नेह ७५ च्यावतीने सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कारसेवक प्रा.मधुसूदन मुळे, ज्योतीताई केसकर, नरेंद्र कुलकर्णी, गिरिष मुळे, श्रीराम येंडे यांच्यासह ग्रुपचे प्रमोदकुमार छाजेड, अभय गांधी, अनिल लोढा, राजाकुमार लुणे, जितेंद्र भळगट, गुलाब गोरे, अशोक पानसरे, नवनाथ नरवडे, अमोल घोलप, कुलकर्णी काका आदि उपस्थित होते. प्रारंभी श्रीरामांच्या प्रतिमापूजन, आरती केल्यानंतर जय श्रीराम घोषणा देण्यात आल्या. कारसेवकांच्या चेहर्यावरील आनंद ग्रुप मधील सदस्यांना स्फुरण आणणारा होता.
यावेळी प्रत्येक्ष कारसेवेत सहभागी झालेल्या ज्योती केसकर, गिरिष मुळे, नरेंद्र कुलकर्णी, श्रीराम येंडे या सवारनी १९९० च्या कारसेवेत कुटूंबापासून दूर जाऊन, घरादाराची पर्वा न करता अन्याय, अत्याचार सहन करत कोट्यावधी भारतीयांच्या श्रद्धेचा हा मुद्दा होता. त्या कारसेवेमुळे आज श्रीराम मंदिराची उभारणी होत आहे, हा रामभेांच्या जीवनातील सर्वात मोठा आनंदी क्षण आहे, अशा भावना व्ये केल्या. माजी पोलिस निरिक्षक गुलाब गोरे यांनी देखील मुंबईत ड्युटीवर असताना त्यावेळची संचारबंदी, कारसेवकांच्या बाबत असलेली आठवणींना उजाळा दिला. प्रास्तविकात राजकुमार लुणे म्हणाले, आजच्या दिवशी त्या वेळेस प्रत्यक्ष कारसेवा करणायारविषयी सन्मान करण्याचा, कृतज्ञता व्ये करण्याचा हा क्षण देखील महत्वाचा आहे, असे सांगितले. प्रमोदकुमार छाजेड यांनी सवारचे आभार मानले.