हजारो रामभक्त रामकथेत झाले दंग

0
91

बाबुर्डी घुमट येथील श्री रामकथा सप्ताहास मोठा प्रतिसाद

नगर -अयोध्येतील मंदिरात २२ जानेवारीला होणार्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा निमित्ताने बाबुर्डी घुमट येथे १५ जानेवारी पासून रामकथेचे सजीव देखाव्यासह आयोजन करण्यात आले असून रामायणाचार्य लक्ष्मणशास्री महाराज कदम यांच्या सुमधूर वाणीतून रामकथा प्रस्तूत केली जात आहे. पंचक्रोशीतील भाविक दररोज या कार्यक्रमात सहभागी होत रामभक्तीत दंग होत आहेत. ग्रामस्थांच्या वतीने १५ते २२ जानेवारी दरम्यान दररोज सायंकाळी ६ ते ९ यावेळेत रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे.आतापर्यंत शिव पार्वती विवाह,रामसीता स्वयंवर असे प्रसंग सजीव देखाव्यासह प्रस्तूत करण्यात आले आहेत.राम,सीता,लक्ष्मणसह रामायणातील पात्र अवतरत असल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळत आहे.

कथेचा दररोजचा भाग संपल्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येत आहे.पहाटेचा काकडा, पूजा अर्चा, गाथा पारायण, भजन असे विविध दैनंदिन कार्यक्रम होत आहेत.कथेचा समारोप २१ जानेवारीला होणार असून गावातून गाथा मिरवणूक काढण्यात येणार आहे.तर २२ जानेवारी रोजी कृष्णा महाराज चौरे पंढरपूर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.पंचक्रोशीतील भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.