नगर – सर्वसाधारणत… प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, इतर राष्ट्रीय कार्यक्रम तसेच विशेष प्रसंगी राष्ट्रध्वजाचा वैयिेकरित्या वापर केला जातो. अशा कार्यक्रमानंतर राष्ट्रध्वज इतस्तत: पडलेले दिसून येतात. अशा प्रकारे राष्ट्रध्वजाची अवहेलना होणार नाही याची सवारनी दक्षता घ्यावी. राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. ध्वजसंहितेतील सर्व नियमांचे व सुचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. कागदी राष्ट्रध्वजाचा वापर ध्वजसंहितेच्या तरतूदीमध्ये नमूद केल्यानुसारच करावा. तसेच बराब झालेले माती लागलेले राष्ट्रध्वज गोणी किंवा कपड्यामध्ये व्यवस्थित बांधुन शिवुन बंद करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी तसेच नागरिकांनी सदर राष्ट्रध्वज तहसिल कार्यालयात सुपूर्द करावेत. राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखावा, असेही कळविण्यात आले आहे.