श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी व्हावे : आ.राम शिंदे

0
26

शहर जिल्हा भाजपाच्यावतीने श्री विशाल गणेश मंदिरासह परिसरात स्वच्छता मोहिम

नगर – आयोध्या येथे निर्माण झालेल्या श्रीराम मंदिरात २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होत आहे. या अभुतपुर्व सोहळ्याची जय्यत तयारी देशभर सुरु असून, देशातील गाव-शहरातील सर्वच मंदिरांची स्वच्छता करण्यात येऊन २२ जानेवारी रोजी मंदिरात सामुदायिक आरती करण्यात येणार आहे. यानिमित्त श्री विशाल गणेश मंदिर व परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. या सोहळ्यात नागरिक सहभागी होत आहे. या सोहळ्यात प्रत्येकाचा सहभाग असावा यासाठी आपआपल्या भागातील मंदिराची स्वच्छता करुन त्या दिवशी मंदिरात आरती, विद्युत रोषणाई, दिपोत्सव आदिंबरोबरच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करुन या अभुतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन आ.राम शिंदे यांनी केले. नगर शहर जिल्हा भाजपाच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या संकल्पनेतून शहराचे ग्रामदैवत श्री गणेश मंदिर परिसरात आ.राम शिंदे व शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

याप्रसंगी वसंत लोढा, प्रा.भानुदास बेरड, सचिन पारखी, प्रशांत मुथा, सुनिल रामदासी, गोकूळ काळे, चंद्रकांत दारुणकर, राजू एकाडे, अनिल सबलोक, बाबासाहेब सानप, प्रविण ढोणे, राहुल जामगावकर, बाळासाहेब भुजबळ, अनिल निकम, सुहास पाथरकर, प्रशांत जोशी, गोपाल वर्मा, मंगेश खंगले, विशाल खैरे, निशांत दातीर, मालनताई ढोणे, लता शेळके, रविंद्र बारस्कर, प्रविण ढोणे, पंडित वाघमारे, ऋषीकेश आगरकर, शशिकांत पालवे, बाळासाहेब गायकवाड, श्रीकांत फंड, शरद बारस्कर, संदिप पवार, अनिल वाकचौरे, सहदेव चव्हाण, मिराताई सरोदे, महेश हेडा, सुनिल तावरे, अक्षय गांधी, भरत चुडिवाल, कैलास गर्जे, निलेश सातपुते, महेश गुगळे, छायाताई रजपुत, लिलाताई आगरवाल, संदिप ढाकणे, विशाल मरकड, भुषण ढापसे, दिपक मगर, अमोल लवांडे, अविनाश कांबळे, विशाल कर्डिले, नंदाताई शेळके, गणेश नन्नवरे, मिनीनाथ मैड, अनिल गट्टाणी, रेणुका करंदीकर, आबा सातपुते, विजय गायकवाड, पंडित खैरे, अजित कोतकर, वैशाली उदावंत, सागर आरडे, दिपक देहेरेकर, राज शेलार, विकास घोरपडे, सौरभ आजबे, हर्षल जोशी, अनंत देसाई, रविंद्र बारस्कर, स्वानंद पिंपुटकर, राजू मंगलारप, डॉ.दरेकर, अनिल ढवण, विजय घासे, कुंडलिक गदादे, विलास नंदी, बाळासाहेब खताडे, सतीश रासने, मयुर बोचुघोळ, जितू ढापसे, सतीश शिंदे, किशोर वाकळे, उमेश साठे, सोमनाथ चिंतामणी, सविता कोटा, प्रिया कुलकर्णी, अक्षय ढाकणे, सुजय मोहिते आदिं उपस्थित होते. यावेळी आ.राम शिंदे यांनी श्री विशाल गणेश मंदिर, संत सावता महाराज मंदिर, क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पुतळा परिसरात स्वच्छता केली. या मोहिमेमध्ये भाजपाचे सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवा वॉरियर्स सहभागी झाले होते.