नगर – भारताच्या इतिहासामध्ये २२ जानेवारी चा दिवस सुवर्ण अक्षरात नोंदवला जाईल, कारण या दिवशी अनेक वषारनी रामलल्ला अयोध्येतील त्यांच्या भव्य मंदिरात निवास करतील. अयोध्येत आता श्रीरामाच्या मूर्ती स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यानिमित्ताने भारतात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे,नगरमधील अय्यप्पा मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे यामध्ये अय्यप्पा सेवा समितीच्या वतीने श्रीराम परिवार भव्य वेशभूषा स्पर्धा घेण्यात येणार आहे अशी माहिती अशी अध्यक्ष के के शेट्टी यांनी दिली आहे या वेशभूषा स्पर्धेत सहभागी संघाला श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांचे एकत्रित परिवार दाखवावा लागेल व रामायणातील या चौघांची कोणतेही वेशभूषा केली तरी चालणार आहे. स्पर्धा हि २२ जानेवारी २४ ला दुपारी ४ वा. श्री अय्यप्पा मंदिर, रेणावीकर नगर,सावेडी नगर या ठिकाणी होणार असून स्पर्धा दोन गटात होणार आहे. पहिला गट १२ वर्षाखालील संघ व दुसरा गट १२ वर्षावरील संघ असा आहे, स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही, दोन्ही गटात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात येणार आहेत त्यांना बक्षीस म्हणून रोख र क्कम, ट्रॉफी व सर्टिफिकेट देण्यात येणार आहे, स्पर्धा सर्वासाठी खुली आहे आपली जीवनशैली बदलली तरीही आपल्या पारंपरिक गोष्टींची ओढ अजूनही आहे.
रामायणाचा वारसा पुढच्या पिढीनेही तितयाच तन्मयतेने जपावा यासाठी मूर्ती स्थापनेनिमित्त खास वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धकांना प्रोत्साहन देणे तसेच समृध्द परंपरेची नव्या पिढीला जाणीव करून देणे आणि स्पर्धात्मकता यांना उत्तेजन देणे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. परीक्षकांकडून स्पर्धकांच्या परीक्षण केले जाईल. आणि त्यांचा निर्णय अंतिम व बंधनकारक असेल. ज्यांना या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यांनी आपली नाव नोंदणी अय्यप्पा मंदिर, रेणावीकर नगर, सावेडी, नगर या ठिकाणी संध्याकाळी ७ वा. कार्यालयात करावी किंवा अधिक माहितीसाठी शंकर बेबी मो-८७६६९७०७५३, श्री गोपी- ९८६०५४२०६८, महेश कांबळे ९२८४९३०६७४ वर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.