माजी नगरसेवकासह त्यांच्या नातेवाईकांच्या अतिक्रमणावर कारवाई करा

0
35

शिष्टमंडळाकडून विविध निवेदनांद्वारे महापालिका आयुेांकडे मागणी

नगर – माजी नगरसेवक व त्यांच्या नातेवाईकांनी विविध ठिकाणी केलेल्या अतिक्रम णांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुे तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांच्याकडे विविध निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. या शिष्टमंडळात माजी नगरसेवक समद खान, मुजाहिद कुरेशी, मानवाधिकार परिषदेचे प्रदेशाध्यक्ष नवेद शेख, पप्पू जहागिरदार, मुजाहिद सय्यद, खालिद शेख, सय्यद वहाब, मौलाना शफीक कासमी, सादिक मेंबर, मुशाहिद शेख, तनवीर शेख, जुबेर शेख, उज़ेर सय्यद, वाहिद हुंडेकरी, मनसूर सय्यद, समीर बेग आदी यावेळी उपस्थित होते. मनपा आयुेांना वेगवेगळी निवेदन देऊन अतिक्रमणाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. मुजाहिद कुरेशी यांनी निवेदनात म्हटले की, शासनाने आरक्षीत केलेली कचरा कुंडीची ४ हजार स्१े. फुटाची जागा बेकायदेशीरपणे बळकावली आहे. सदरच्या ठिकाणी सय्यद जफर हसनमिया व त्याचे गुंड प्रवृत्तीच्या नातेवाईकांनी अनधिकृत व विनापरवाना बांधकाम केलेले आहे.

सदरचे बांधकाम पाडण्याबाबत अर्ज केलेला होता. सदरच्या अर्जावर अद्यापपयरत कारवाई करण्यात आलेली नाही. खालिद दिलदार हुसेन यांनी निवेदनात म्हटले की, अनधिकृत व विनापरवाना बांधकाम असलेले लाईन बाजार कोठला येथील बेकरी, मोबाईल शॉपी, ट ्रॅव्हल्स ऑफिस व एक चहाची टपरी हे बेकायदेशीर बांधलेले आहे. सदर बांधकाम पाडण्याबाबत अर्ज केलेला होता. त्यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. सदर ठिकाणी तातडीने कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे. शेख मुशाईद लियाकत यांनी निवेदनात म्हटले की, गैबीपिर झेंडीगेट या परिसरातील जागा बेकायदेशीरपणे बळकावून तेथील दहा हजार स्१े. फुटाच्या जागेवर बांधकाम करून टपर्‍या उभारल्या आहेत. शेख नजीर अहमद उर्फ नज्जू पहेलवान व त्यांच्या सहकार्‍यांनी अनधिकृतपणे व विनापरवाना पत्र्याचे शेड व टपर्‍या उभारल्या आहेत. सदरचे अतिक्रमण काढण्याबाबत आपल्याकडे अर्ज केलेला होता. त्यावर कारवाई केलेली नाही. शेख गुलाम दस्तगीर यांनी निवेदनात म्हटले की, झेंडीगेट परिसरात पिण्याच्या पाणी बंद बाटली व पाण्याच्या जारचा प्लँट बेकायदेशीरपणे चालविला जात आहे. सदरचे पाणी विकण्याकरीता ज्या प्लास्टिकचा वापर केला जात आहे ते प्लास्टिक रियुझेबल नाही. सदर ठिकाणी शासनाच्या मालकीच्या पाईपलाईनमधून अवैधरित्या पाणी उपसा केला जात आहे. सदर ठिकाणी औद्योगिक क्षेत्रामध्ये लागणारे हाय होलटेज विजेचा वापर करून परिसरात राहणार्‍या लोकांस धोका निर्माण झालेला आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून बेकायदेशीर काम बंद करावे.

शेख मुशाईद लियाकत यांनी निवेदनात म्हटले की, वेलजी हाईट येथे पाकिरगसाठी आरक्षीत ठेवलेल्या जागेमध्ये अनधिकृतपणे बांधकाम करून त्यात नज्जू पहेलवान व त्यांचे नातेवाईक राहत आहेत. ती जागा बेकायदेशीरपणे बळकावलेली असल्याबाबतचा अर्ज केला होता. सदरचे बांधकाम पाडण्याबाबत अद्यापपयरत कारवाई करण्यात आलेली नाही. सय्यद वाहब उमर यांनी निवेदनात म्हटले की, सिटी सर्वे नंबर १८४९/१/१/२ या जागेवर बेकायदेशीररित्या बांधकाम केलेले आहे. सदरचे बांधकाम शेख नजीर अहमद जहागीरदार व शेख वाजीद नजीर जहागीरदार यांनी मनपाकडून घेतलेल्या परवानगीविरूध्द बांधकाम केलेले आहे. सदरचे बांधकाम पाडण्यात यावेत. शफिक रशिद अहमद शेख यांनी निवेदनात म्हटले की,मनपा हद्दीतील छोटी मरीयम मस्जिदजवळ मुकुंदनगर येथे अलताफ शहा मेहमूद जहागिरदार याने दंडशाहीच्या जोरावर प्लॉट बळकावून तेथे चाळ बांधून तेथून स्वत:चा आर्थिक लाभ घेतला जात आहे. सदरचे बेकायदेशीर अतिक्रमण पाडण्यासाठी अर्ज केलेला होता. सदरच्या अर्जावर अद्याप काय कारवाई करण्यात आली. त्याचा तपशील देण्यात यावा. जर सदर अर्जावर कारवाई झाली नसल्यास त्याबाबतचे कारण लेखी स्वरूपात देण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे.

संयुक्त पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश

या शिष्टमंडळाने आयुे डॉ. पंकज जावळे यांची बुधवारी (दि.१०) समक्ष भेट घेवून
विविध निवेदने दिली. या निवेदनांची आयुेांनी गांभिर्याने दखल घेत नगर रचना विभाग,
उपायुे तसेच प्रभाग अधिकार्‍यांनी तातडीने संयुे पाहणी करून अहवाल सादर करण्याचे
लेखी आदेश दिले असून याबाबत निश्चित कारवाई केली जाईल असे आश्वासन शिष्टमंडळाला
दिले आहे.