शहर वकील संघटनेची निवडणूक बिनविरोध

0
40

ऐतिहासिक जिल्हा न्यायालयाची द्विशताब्दी साजरी करण्यास प्रथम प्राधान्य : अध्यक्ष ॲड.नरेश गुगळे

नगर – शहर वकील संघटनेची २०२३-२४ वर्षासाठीच्या कार्यकारणीची निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड. अशोक गुंड यांनी २१ डिसेंबर रोजी सायंकाळी अंतिम निकाल जिल्हा न्यायालयात जाहीर केला. यामध्ये अध्यक्षपदी ज्येष्ठ विधीज्ञ नरेश गुगळे, उपाध्यक्षपदी अ‍ॅड. महेश शेडाळे व सचिवपदी अ‍ॅड.संदीप शेळके यांच्यासह कार्यकारणीची निवड झाली. केवळ महिला सहसचिव या एका पदासाठी मतदान घ्यावे लागले. यामध्ये अ‍ॅड. भेी शिरसाठ या निवडून आल्या. संघटनेची कार्यकारणी पुढीलप्रमाणे खजिनदार अ‍ॅड. शिवाजी शिरसाठ, सह सचिव अ‍ॅड. संजय सुंबे, कार्यकारणी सदस्य अ‍ॅड.अमोल अकोलकर, अ‍ॅड. सारस क्षेत्रे, अ‍ॅड. विनोद रणसिंग, अ‍ॅड. देवदत्त शहाणे, अ‍ॅड. शिवाजी शिंदे व अ‍ॅड.अस्मिता उदावंत. यावेळी अ‍ॅड. नरेश गुगळे म्हणाले, नगरच्या ऐतिहासिक जिल्हा न्यायालयास यंदा २०० वर्ष पूर्ण होत आहेत. न्यायालयाच्या द्विशताब्दी काळात मला अध्यक्षपदाची जबाबदारी मिळणे हे भा१/२याचे आहे. न्यायालयाची द्विशताब्दी साजरी करण्यास प्रथम प्राधान्य देणार आहोत. यासाठी वर्षभर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना यासाठी पाचारण करणार आहोत.

तसेच वकिलांसाठी विविध उपक्रम, तज्ञांचे मार्गदर्शन, प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन करणार आहोत. संस्कारक्षम ज्युनिअर वकील घडण्यासाठी लक्ष केंद्रित करणार आहोत. जिल्हा न्यायालयातील सर्व वकिलांनी माझ्यासह सर्व कार्यकारणीवर मोठा विश्वास व्ये करून आम्हाला बिनविरोध निवडून आणल्याबद्दल सवारचे आभार मानतो. बर्‍याच वर्षानंतर शहर वकील संघटनेची निवडून बिनविरोध पार पडली आहे. त्यामुळे सवारच्या अपेक्षेनेच ही निवड झाली आहे. निवडून आल्यावर सर्व नूतन पदाधिकार्‍यांनी जिल्हा न्यायालयात जल्लोष करून विजयोत्सव साजरा केला. यावेळी मावळते उपाध्यक्ष राजाभाऊ शिर्के, सचिव गौरव दांगट, राजेश कावरे, अनिता दिघे, प्रभाकर शहाणे, वृषाली तांदळे, वैभव आघाव, बेबी पालवे, रमेश कराळे, गोरख तांदळे, स्वाती पाटील, सुचिता कुलकर्णी आदींसह उपस्थित होते.