स्त्रियांना झोपेच्या समस्या जास्त

0
28

कॅलिफोर्नियास्थित ‘एसआरआय रिसर्च इन्स्टिट्यूट’च्या ‘ह्युमन स्लीप रिसर्च प्रोग्राम’च्या संचालक फिओना बेकर यांच्या मते, महिलांमध्ये झोपेची समस्या पौगंडावस्थेपासून सुरू होते आणि प्रौढत्वापर्यंत चालू राहते. मासिक पाळीच्या दरम्यान हार्मोनल बदल हे त्याचे मुख्य कारण आहे. मासिक पाळीच्या दरम्यान हार्मोनल बदलांमुळे चिंता आणि सौम्य उदासीनता महिलांमध्ये उद्भवते. याशिवाय पेटके, पोटाशी संबंधित समस्याही आहेत. या सर्वांचा झोपेवर परिणाम होतो. त्याच वेळी, गर्भधारणेदरम्यान शारीरिक समस्यादेखील वाढतात. त्यामुळे झोपेची नियमि तता कमी होते. यानंतर, रजोनिवृत्ती दरम्यानदेखील सुमारे सात वर्षे हार्मोनल बदल होतात. याचा झोपेवरही परिणाम होतो. झोपेच्या समस्या असलेल्या महिलांसाठी ‘कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी’ प्रभावी आहे. यामध्ये मानसशास्त्रीय आणि वर्तणुकीचे तंत्र वापरले जाते. नकारात्मक विचार कमी करणे, योगासने आणि प्राणायाम करणे, झोपेच्या वेळेत बदल करणे हे उपाय केल्याने झोप न येण्याच्या समस्येवर मात करता येते. याशिवाय हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीदेखील प्रभावी आहे. यामध्ये रजोनिवृत्तीच्या काळात कमी होणारे हार्मोन्स सप्लिमेंट्सच्या माध्यमातून पूर्ण होतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ही थेरपी घेता येते. यामुळे झोप न येण्या समस्येचे निर्मूलन होऊ शकते.