कॉलेजमधील आमच्या लाडक्या प्राध्यापकांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही कॉलेजचे मित्रमैत्रिणी जवळपास वीस वर्षांनी एकम ेकांना भेटलो होतो. मोजकेच मित्रमैत्रिणी कॉलेजला असताना दिसायचे तसेच चाळिशीतही दिसत होते. परंतु बर्याचशा मित्रमैत्रिणींच्या चेहर्यावर वयाच्या खुणा जाणवत होत्या. चष्मा लागलेला, केस पांढरे, काहींना टक्कल पडलेले, पोटाचा घेर वाढलेला, खांदे झुकलेले, तणावयुक्त चेहरा, चेहर्यावर काळे वांग आलेले असे चित्र दिसत होते. कॉलेजमध्ये नेहमी खळखळून हसणार्या मैत्रिणी जणू हसणेच विसरल्या होत्या. कॉलेजमध्ये चवळीच्या शेंगेसारख्या दिसणार्या मैत्रिणी अगदी दुधीभोपळ्यासारख्या झाल्या होत्या. ओळखू न येण्याएवढा बदल काहींमध्ये झाला होता.
मधल्या वीस वर्षांमध्ये प्रत्येक जण आपल्या करिअर व संसारामध्ये जम बसवण्यासाठी धावपळ करत असतो. हे करताना ’तिशी’तून ’चाळिशी’ मध्ये कधी प्रवेश करतो, हे कुणाला समजतच नाही. साधारणत: 38, 39, 40 तसेच 41, 42, 43 यापैकी कुठलेही वय असले तरी ती चाळिशीचं समजावी. चाळिशीची पहिली खूण जाणवते ती म्हणजे नेहमी वाचता न येणारे वर्तमानपत्र वाचताना डोळे दुखायला लागतात. अक्षरे अंधूक दिसायला लागतात. तसेच आरशासमोर उभे राहिल्यानंतर केसांमध्ये काही बटा पांढर्या झालेल्या दिसतात. ’माझे तारुण्य कधी निघून गेले हे मला कामाच्या व्यापांमध्ये लक्षातच आले नाही. मला तारुण्यात जे जीवन जगायचे होते ते राहूनच गेले’ असे प्रत्येकीला वाटते. चाळिशी म्हणजे वृद्धत्वाची चाहूल होय. वृद्धत्व समोर दिसत असले, तरी प्रत्यक्षात ते येण्यास पंधरा-वीस वर्ष अवकाश असतो. परंतु तो काळ सुरळीत पार पडण्यासाठी आत्तापासूनच शरीराची काळजी घ्यावी लागते. सुंदर दिसावे असे प्रत्येकीला वाटते. मात्र चेहरा आणि शरीर तजेलदार व सुंदर दिसण्यासाठी फक्त सौंदर्य प्रसाधनांचा वापर करून उपयोग नाही. चिरतारुण्य टिकवण्यासाठी व त्वचा सतेज राहण्यासाठी जीवनशैलीत योग्य बदल आणि योग्य आहार महत्त्वाचा आहे. आत्तापर्यंत मसालेदार, तेलकट, पदार्थ खाल्ले तरी जमत होते. रात्रीच्या जागरणाने त्रास होत नव्हता. परंतु इथून पुढे अनियमित जीवनशैली व आहार जमणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे. खालील उपाय व पथ्य रोजच्या जीवनात आचरणात आणले तर चांगले आरोग्य टिकून राहील.
1) संतुलित आहार घ्यावा – चमचमीत, चटकदार, मसालेदार, तेलकट, मटन, अंडी तसेच फास्ट फूड खाणे टाळावे आणि नैसर्गिक समतोल आहार घ्यावा. कारण चुकीच्या आहारामुळे वजन वाढते व त्यातूनच रक्तदाब, हृदयरोग असे आजार होतात. गाजर, काकडी, टोमॅटो, कोबी व कांद्याची पात हे पदार्थ सॅलड स्वरूपात सुरुवातीलाच कच्चे खावेत.
डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे
दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर
अहमदनगर मोबाईल नं- 8793400400