सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे ऋषीतुल्य व्यक्तींचा सत्कार

0
41

नगर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक संस्था आहेत. त्यामध्ये आरोग्य भारती, जनकल्याण रक्तपेढी, संस्कार भारती, कुटुंब प्रबोधन संस्था आदिवासींची वस्तीगृह इत्यादी. समाजसेवे बरोबरच अगदी सामान्यतला सामान्य माणूस संस्कारीत करून त्यांना सेवाकार्याच्या प्रवाहात आणणे, कार्यकर्ते निर्माण करणे ही संघाची उद्दिष्टे राहिलेली आहेत. मी सुद्धा एक
साधा सेवा कार्यकर्ता असून तुम्ही सुद्धा समाजासाठी सेवा कार्य करायला हरकत नाही, असे प्रतिपादन डॉ.दिलीप धनेश्वर
यांनी केले. सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे डॉ. दिलीप धनेश्वर व
ह. भ प. प्रभाताई भोंग या ऋषीतुल्य व्यक्तींच्या सत्कार
करण्यात आला.
यावेळी हभप. प्रभाताई भोंग म्हणाल्या की, सत्कार
म्हणजे स्वतःला आकार देणे. माझ्या सद्गुरू मुळे मी
अध्यात्मक क्षेत्रात आले. संत हे स्वर्गलोकीचे ईश्वर
आहेत म्हणून संतांच्या सहवासात राहावे. सद्गुरू शिवाय
मानवाला पर्याय नाही. माणूस जन्म हा दुर्लभ आहे तेव्हा
या जन्मात आपण सत्कर्म व भक्ती करून मोक्ष मिळवू
शकतो. प्रयत्न केल्याने सर्व साध्य होते आणि त्यालाच
परमेश्वर सहाय्य करतो.
डॉ. दिलीप धनेश्वर यांच्या परिचय एस आर जोशी
यांनी करून दिला तर ह. भ. प. प्रभाताई भोंग यांचा
परिचय पुष्पाताई चितांबर यांनी करून दिला. समाजकार्य,
अध्यात्म क्षेत्र, राजकीय क्षेत्रात संस्कार वर्ग या सर्व
क्षेत्रात निस्वार्थपणे कार्य करणार्‍यांचा दरवर्षी मंचातर्फे
ऋषीतुल्य पुरस्कार देऊन सन्मान केला जातो.
यावेळी मंचाचे कार्यकारणी, सदस्य उपस्थित होते.
यावेळी सभासदांचे वाढदिवस साजरा करण्यात आला.
सूत्रसंचालन पुष्पा कोरे यांनी केले. हर्षवर्धन थिगळे
यांनी आभार मानले. श्रुती आंधळे यांच्या पसायदानाने
कार्यक्रमाची सांगता झाली.