नगर – शहरातील वॉर्ड क्र. १२ व १३मधील जीपीओ स्त्यावरील साचलेले पाणी बाजूच्या गटार मधून वाहते केलेले आहे. तसेच या रस्त्याचे काम नव्या संकल्पनेवर आधारित करण्यात येत असल्याने भविष्यात हा प्रश्न पुन्हा उद्भवणार नाही असे
लेखी आश्वासन महापालिकेच्या शहर अभियंत्यांनी दिल्यामुळे २६ सप्टेंबर रोजी करण्यात येणारे आत्मदहन आंदोलन स्थगित
करण्यात आले आहे. याबाबत अॅड.सलीम मोहम्मद शरीफ रंगरेज यांच्यासह नागरिकांनी या आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावर शहर अभियंता मनोज पारखे यांनी त्यांना लेखी आश्वासन दिले आहे. यात म्हंटले आहे की, जुने कलेक्टर ऑफिस रस्ता हा नव्याने संकल्पनेवर आधारित असल्या कारणामुळे रस्ता खोदते वेळेस त्या ठिकाणच्या भूमिगत गटार व पाण्याचे लाईन तुटलेले असल्यामुळे व त्यातील पाणी रस्त्यावर साचून राहिल्याने रस्त्याचे काम हाती घेता आले नाही. परंतु दरम्यानच्या काळात रस्ता बाजू गटर मधून पाणी वाहते करून त्या ठिकाणी वाहणारे पाणी बंद करण्यात आलेले आहे व
रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे . परंतु सदरचा रस्ता हा पूर्ण नव्या संकल्पनेवर आधारित असल्या कारणामुळे
सध्या रस्ता वापरता येणार नसल्याने अन्य पर्यायी मार्गाचा वापर करण्यात यावा. असे या पत्रात म्हटले आहे. या शिवाय
जुना मंगळवार बाजार येथे ड्रेनेज दुरुस्तीचे काम हाती घेऊन पूर्णपणे बंद केले आहे. सदरचे रस्त्यावरून
पाणी वाहणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे. तसेच या ठिकाणी भूमिगत गटार पाईपचा
व्यास कमी प्रमाणात असल्यामुळे ती वारंवार चोकअप होते. त्यामुळेत्या ठिकाणी मोठ्या व्यासाचे पाईप टाकणेची मागणी
करण्यात आलेली असून काम सुरू प्रत्यक्ष सुरू होण्यास दोन दिवस लागणार आहेत व तोपर्यंत रस्त्यावरून
वाहणारे सर्व घाण पाणी बंद करण्यात आलेले आहे. असे ही या पत्रात म्हटले आहे.