नवरात्रोत्सवात ठिकठिकाणी होतोयं मातृशक्तीचा जागर; ‘आदर्श परिवार’ घडवण्यासाठी ‘विचार भारतीचा’ उपक्रम

0
43

नगर – आदिशक्ती देवीचे नवरात्र
सध्या सर्वत्र भक्तिभावाने साजरे होत
आहे. या नवरात्र उत्सवात मराठमोळ्या
लोककलेच्या माध्यमातून मातृशक्तीचा
जागर अहिल्यानगर शहरात विचार
भारतीच्या वतीने करण्यात येत
आहे. ‘मातृशक्तीचा जागर करू या !
आदर्श परिवार घडवू या !’ या समाज
प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन
शहरात ठिकठिकाणी करण्यात
येत आहे. लोककलावंत अभियंता
सोमनाथ तरटे हे साथीदारांसह
शहरातील विविध नवरात्रीच्या मंडळांमध्ये रोज सायंकाळी
गोंधळाच्या माध्यमातून कर्तृत्ववान मातृशक्तीचा जागर
करून भाविकांमध्ये वैचारिक जनजागृती करत आहेत.
या उपक्रमाचा शुभारंभ पाईपलाईन रोड वरील
तुळजाभवानी देवी मंदिरात करण्यात आला. या
कार्यक्रमातून आदिशक्ती देवीच्या जागर होण्याबरोबरच
राजमाता जिजाबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई, रणरागिणी
राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, संत कान्होपात्रा,
गानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर, सुवर्णकन्या पी.टी.
उषा, अंतराळवीर कल्पना चावला व सध्याच्या राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू या कर्तृत्ववान स्त्रियांच्या कर्तृत्वाचा जागर
करणारे फ्लेक्सचे प्रदर्शन कार्यक्रम स्थळी लावण्यात
आले होते. तसेच मी शिवबा घडवणार, मी जिजाऊ
होणार ! हा सेल्फी पॉईंटही येथे लावण्यात आला होता.
या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन मंदिराच्या महिला सदस्यांच्या
व महिला भाविकांच्या उपस्थित झाले.
हे प्रदेशन पाहण्यासाठी व सेल्फी
पॉईंटवर सेल्फी घेण्यासाठी महिलांनी
गर्दी केली होती.
यावेळी अभियंता सोमनाथ तरटे
यांनी गोंधळ लोककलेतून कतृत्त्ववान
स्त्रियांच्या महिमा सांगून महिलांमध्ये
प्रबोधन केले, तसेच बाल शाहीर गणेश
जाधव याने आपल्या पहाडी आवाजात
शिवाजी महाराजांचा जयजयकारात
अफजल खानाचा वधाचा पोवाडा सादर
करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी विचार भारतीचे उपाध्यक्ष अशोकराव गायकवाड,
उपक्रमाचे प्रमुख पुष्कर कुलकर्णी, अशोक कानडे, अमित
खामकर, ओमप्रकाश तिवारी, स्मिता शितोळे, विचार भारतीचे
मार्गदर्शक रवींद्र मुळे आदींसह भाविक उपस्थित होते.
विचार भारतीचे अध्यक्ष अरुण कुलकर्णी, सचिव सुधीर
लांडगे, सहसचिव महेंद्र जाखेटे व उपक्रमाचे संयोजक पुष्कर
कुलकर्णी आदींनी या उपक्रमाचे नियोजन केले.