रामकृष्ण अर्बन क्रेडिट सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

0
73

सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर, ठेवीदार, सभासद, खातेदार यांच्या विश्वासामुळे संसथेची प्रगती : चेअरमन किसनलाल बंग

नगर – रामकृष्ण अर्बन क्रेडिट
सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर
ही पहिलीच वार्षिक सर्वसाधारण सभा
आहे. डोंगरे महाराज यांच्या आशीर्वादाने व स्वर्गीय
काकासाहेब धूत यांच्या प्रेरणेने व सर्वांच्या सहकार्याने
स्थापन झालेल्या संस्थेची दिवसेंदिवस प्रगती
होत आहे. संस्थेचा आर्थिक लेखाजोखा आपणा
सर्वांसमोर मांडताना मनस्वी आनंद होत आहे.
संस्थेचा सर्व कारभार स्वभांडवलावर अत्यंत चोखपणे
व पारदर्शीपणे चालू आहे. संस्थेच्या ठेवींचा योग्यरीतीने
विनियोग करून संस्थेने समाजातील सर्व स्तरातील
गरजूंना मदत करून त्यांच्या आर्थिक प्रगतीला
हातभार लावला आहे. संस्थेने कोणत्याही बँकेंकडून
वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतलेले नाही, मात्र संस्थेने
इतर बँकेत ठेवलेल्या संस्थेच्या ठेवींवर तात्पुरता
ओव्हरड्राफ्ट गरजेपुरता घेऊन तो वेळोवेळी परतही
केला आहे. ठेवींमध्ये गतवर्षीपेक्षा वाढ होऊन अहवाल
साली ८३ कोटी ६२ लाख रुपये इतक्या रकमेच्या
ठेवी आहेत. संस्थेचा रिझर्व व इतर फंड ३४ कोटी
८० लाख रुपये इतका आहे. संस्थेची इतर बँकांमध्ये
८१ कोटी ३ लाख रुपये रकमेची सुरक्षित गुंतवणूक
आहे. तसेच सर्वांच्या सहकार्याने संस्थेला यावर्षी ४
कोटी १४ लाख रुपये इतका विक्रमी नफा झालेला
आहे.आपणा सर्वांचे संस्थेवर असलेल्या विश्वासाचे हे
प्रतीक आहे. नेहमीप्रमाणे याही वर्षी संस्थेने १५%
लाभांश जाहीर केला आहे. संस्थेस ऑडिट अ वर्ग
मिळालेला आहे. एनपीए शून्य
टक्के आहे. रामकृष्ण क्रेडिट अर्बन
चे सभासद खातेदार, ठेविदार व
हितचिंतक आणि सर्व तत्कालीन
व विद्यमान संचालक यांनी
दाखविलेल्या विश्वासामुळे संस्था
प्रगतीपथावर आहे. संस्थेच्या
सावेडी शाखेला ११ वर्षे पूर्ण झाली
आहेत.सावेडी परिसरातील सर्व
सभासद, खातेदार व हितचिंतक
यांनी दिलेल्या उत्तम प्रतिसादामुळे
सावेडी शाखेचा नफा अकरा
लाख ५५ हजार रू इतका आहे.
तसेच आपल्या संस्थेची मोबाईल
बँकिंग सेवा उपलब्ध आहे.
त्याचा सभासदांनी लाभ घ्यावा.
संस्थेचे संचालक व संस्थेच्या
सेवक वर्ग ही संस्थेच्या आर्थिक
प्रगतीची रथाची दोन चाके आहेत.संचालक व सेवक
वर्ग निस्वार्थी असल्यामुळे संस्थेच्या प्रगतीत मोठा
हातभार लागला आहे.तसेच सभासदांचे सहकार्य आणि
आत्मीयतेचा फार मोठा वाटा संस्थेच्या प्रगतीत आहे,
असे प्रतिपादन रामकृष्ण अर्बन क्रेडिट सोसायटी चे
चेअरमन किसनलाल बंग यांनी केले आहे.
रामकृष्ण अर्बन सहकारी क्रेडिट सोसायटीची
४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा बडीसाजन मंगल
कार्यालय येथे किसनलाल बंग यांच्या अध्यक्षतेखाली
खेळीमेळीत पार पडली. याप्रसंगी सहकार कायद्याप्रमाणे
सहकारी प्रशिक्षण संघाचे अधिकारी एस.एल.साखरे
यांनी सभासदांचे प्रशिक्षण घेतले. यावेळी संस्थापक
श्रीगोपाल धूत, व्हाईस चेअरमन राजेंद्र मालू,
संचालक अ‍ॅड. राजेंद्र गुजराथी,
प्रदीप पंजाबी, सुधीर झालानी,
प्रकाश गांधी, लक्ष्मीकांत झंवर,
ओमप्रकाश चांडक, गोपाल
मणियार, विश्वनाथ कासट,
मधुसूदन सारडा, अ‍ॅड. अशोक
बंग, अनुराग धूत, सौ.राजकमल
मिनियार, सौ.शोभा राठी,
अनुराधा झगडे, देवराव साठे,
साईनाथ कावट, व्यवस्थापक
शशिकांत पुंडलिक, अधिकारी
कुमार आपटे आदींसह सभासद,
ठेवीदार उपस्थित होते.
सहकारी प्रशिक्षण अधिकारी
म्हणाले एस एल साखरे म्हणाले,
सभासद हे संस्थेचे मालक
असतात. सभासदांनी क्रियाशील
होऊन संस्थेच्या कार्यात सहभाग
वाढवला पाहिजे. यासाठी सहकार कायदानुसार
प्रशिक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.
सोसायटीचे सभासद उद्योजक नरेंद्र फिरोदिया
यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, गेली ४०
वर्ष भक्कम पायावर उभी असलेली रामकृष्ण सोसायटी
ही एकमेव संस्था आहे. सध्याच्या काळात अनेक
सुरू झालेल्या पतसंस्था बंद पडल्या
किंवा अडचणीत आल्या. या पार्श्वभूमीवर
रामकृष्णची प्रगती व विश्वासाहर्ता
कौतुकास्पद आहे.
वार्षिक सर्वसाधारण सभेत आर.डी.मंत्री, सुरेश
सिकची, कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. शरद पल्लोड,
लक्ष्मीनारायण लढे, अनिल झंवर यांनी उपस्थित
केलेल्या विविध प्रश्नांना चेअरमन किसनलाल बंग
यांनी समर्पक उत्तरे देत संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम
असल्याचे निदर्शनास आणून दिले. या उत्तराबद्दल
सर्व उपस्थित सभासदांनी समाधान व्यक्त करीत
सोसायटीचे संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी
व एकूणच चांगल्या कारभारावर विश्वास व्यक्त केला.
प्रारंभी व्यवस्थापक शशिकांत पुंडलिक यांनी अहवाल
वाचन केले. व विषय पत्रिकेवरील विषयांची माहिती
दिली. लेखापरीक्षक मे.एन.जे.लोहे अ‍ॅण्ड कंपनीचे
सीए तुषार लोहे, सीए पुनीत व्होरा, सनदी लेखापाल
मे.संजय डी नावंदर कंपनीचे सीए संजय नावंदर यांनी
लेखा परीक्षण केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डोंगरे महाराजांच्या
प्रतिमेचे पूजन उद्योगपती नरेंद्र फिरोदीया, प्रशांत
जाजू, संजय गांधी, पाली माकर, राजेंद्र थोकरीया, सौ.
रंजना सोनी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन सौ.मीरा मुळे यांनी केले. तर व्हाईस
चेअरमन राजेंद्र मालू यांनी आभार मानले. सभेच्या
शेवटी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.