गौरीशंकर मित्र मंडळ (ट्रस्ट) येथे नवरात्र उत्सवानिमित्त घटस्थापना

0
36

नगर – गौरी घुमट येथील गौरीशंकर मित्र मंडळ ट्रस्ट च्यावतीने शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त तुळजाभवानी मातेच्या मंदिरात भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा व माजी नगराध्यक्ष लता लोढा यांच्या हस्ते विधिवत पूजन करून घटस्थापना करण्यात आली. व देवीची महाआरती करण्यात आली. याप्रसंगी सागर शिंदे, संजय वल्लाकट्टी, रवींद्र चवंडके,
राजेंद्र गायकवाड, संदीप शिंदे, जयेश शिंदे, रोहन चंगेडिया, अथर्व शिंदे, बाळासाहेब खताडे, विजयकुमार शिंदे, गौरी
शिंदे, नीता शिंदे, स्वाती शिंदे, सुशीला शिंदे, श्रद्धा शिंदे, तेजस्वी यादव आदींसह उपस्थित होते. सर्वत्र शारदिय नवरात्र उत्सव आनंदाने साजरा होत आहे. आई तुळजाभवानी ही शक्ती देणारी देवता आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांना अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी देवी मातेने तलवार दिली होती. त्याचप्रमाणे शहर विकासासाठी हे माते तू बळ दे. अशी मागणी वसंत लोढा यांनी केली आहे. थोड्याच दिवसांनी महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत शहर विकासाचा ध्यास घेणार्‍या उमेदवारांना देवी माता शक्ती प्रदान करो. ही प्रार्थना आई तुळजाभवानी चरणी करण्यात आली आहे.