नवरात्रीनिमित्त अहिल्यानगर महापालिकेकडून केडगाव देवी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम

0
36

नगर – शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर महानगरपालिकेने केडगाव येथील देवी मंदिर परिसरात
विशेष स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ केला. मंदिराकडे येणार्‍या रस्त्यांची व रस्त्यालगतच्या परिसराची साफसफाई व स्वच्छता करण्यात आली. नवरात्रोत्सवात  भाविकांना अडचणी येऊ नयेत, या दृष्टीने देवी मंदिर मार्गावरील नादुरुस्त पथदिवे दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केडगाव देवी मंदिरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन उपाययोजना करण्यात येत आहेत. मंदिराकडे येणार्‍या रस्त्यांवर काही ठिकाणी कचरा साचलेला होता. स्वच्छता मोहिमेअंतर्गत मंदिर परिसर व रस्त्यालगतचा हरित कचरा, प्लास्टिक कचरा व इतर कचरा उचलण्यात आला व परिसर स्वच्छ करण्यात आला. या
मार्गावरील इतर आवश्यक कामे पूर्ण
करण्याच्या सूचना देण्यात आल्या
आहेत. विशेषतः मंदिराकडे येणार्‍या
रस्त्यांवर पथदिव्यांची तपासणी
करून बंद पथदिवे तत्काळ सुरू
करण्याचे निर्देश दिले असल्याचेही
यशवंत डांगे यांनी सांगितले.
दरम्यान, स्वच्छता
सेवा पंधरवाडा अंतर्गत
माळीवाडा बसस्थानक परिसरात
महानगरपालिकेच्या वतीने
स्वच्छता अभियान राबविण्यात
आले. नागरिकांच्या सहकार्यातून
बसस्थानक परिसरात पडलेला
कचरा, प्लॅस्टिक कचरा उचलून
बसस्थानक परिसरात स्वच्छता
करण्यात आली. २ ऑक्टोबर
पर्यंत हे अभियान सुरू असून,
नागरिकांनीही यात सहभागी व्हावे, असे आवाहन यशवंत
डांगे यांनी केले आहे.