आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये रुग्णांचे आरोग्य जपले जात

0
154

उद्योजक किरण रांका यांचे प्रतिपादन; दुबिर्णीद्वारे शस्त्रक्रिया तपासणी शिबीर : महिनाभरात ४४४४ रुग्णांची तपासणी

नगर – आनंदऋषीजी हॉस्पिटलध्ये रुग्णांची मानसिकता समजावून घेऊन त्यांच्या आजाराने योग्य ते निदान करून उपचार
केले जातात. रूग्णाचे आरोग्य जपले जाते, असा विश्वास रांका ज्वेलर्सचे किरण रांका यांनी व्यक्त केला.

राष्ट्रसंत आचार्यश्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या ३३ व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित ‘दुबिर्णीव्दारे शस्त्रक्रिया’ या
मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. तेव्हा ते बोलत होते. यावेळी सुर्यकांत रांका,
नारंगीबाई शिंगवी, सौ.अनिताताई रांका, सौ.प्रीतम रांका, तज्ञ डॉ. लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ.भास्कर जाधव, डॉ.आर.एन.पांडे, डॉ.राहुल कांडेकर, डॉ.रविंद्र मुथा, डॉ. हिरल चौधरी, संतोष बोथरा, सतिष लोढा, माणकचंद
कटारिया, अनिल मेहेर आदि उपस्थित होते. डॉ.आशिष भंडारी यांनी स्वागत केले.

उद्योजक किरण रांका पुढे म्हणाले, जैन सोशल फेडरेशनचे कार्यकर्ते, हॉस्पीटलमधील तज्ज्ञ डॉटर्स, नर्सेस, कर्मचारी या सर्वांचेच आपलेपणाचे सहकार्य रूग्णाला भावते. या शिबिर आयोजनात आमच्या रांका परिवाराला खारीचा वाटा मिळतो, हे आमचे भाग्यच आहे. यापुढेही शिबिराच्या आयोजनात सहभाग देत राहू, अशी ग्वाही देतो.
प्रास्तविक करताना संतोष बोथरा म्हणाले, रुग्णांना जीवनदान देण्याचे कार्य हॉस्पीटलच्या माध्यमातून सुरु आहे. आचार्य श्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या आशीर्वादाने आणि प्रबुद्ध विचारक आदर्शऋषीजी म.सा. यांच्या मार्गदर्शनाने वैद्यकीय सेवा सुरू आहे. अत्यल्प दरात अद्ययावत मशिनरी व सुविधांसह येथील सेवा दानशूर व्यक्तींच्या योगदानामुळे दिली जात आहे. मागील एक महिन्यापासून सुरु असलेल्या या शिबीरामध्ये ४४४४ रुग्णांची तपासणी करण्यात येऊन आवश्यक त्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. समाजसेवेचे हे व्रत असेच पुढेही चालू राहिल. यावेळी तज्ञ डॉ.आर.एन.पांडे
म्हणाले, रुग्णांची सेवा आमच्या हातातून घडत आहे, हे आमचे भाग्य आहे. हॉस्पिटलमध्ये अनेक शिबीरे आयोजित करण्यात येतात. या शिबीरात चांगली सेवा  दिली जात असल्याने असंख्य रुग्ण येतात या हॉस्पिटलचा नावलौकीक संपुर्ण जगात आहे. आम्ही डॉटर्स सुद्धा रुग्णांना चांगले मार्गदर्शन करतो. त्यामुळे रुग्णांना एक विश्वास मिळातो. तो संपुर्ण बरा होतो, असे सांगून शिबीरातील शस्त्रक्रियांची त्यांनी माहिती दिली. शिबीरात दुबिर्णीव्दारे शस्त्रक्रिया (बिनाटाका) – लॅप्रोस्कोपी पोटावरील जागेचे, बेंबीचे ऑपरेशन व जांघेतील हार्नियाची शस्त्रक्रिया, पित्ताशय काढणे, स्त्रीयांची गर्भाशयाची पिशवी काढणे (हिस्ट्रोटॉमी), स्टॅपलर, लेझर पाईल्स शस्त्रक्रिया, अ‍ॅपेडिस ऑपरेशन, लॅप्रोस्कोपी स्त्रीयांचे बिजांडपोशावरील गाठी शस्त्रक्रिया, स्त्रीयांचे वंध्यत्वाची तपासणी करीता गर्भनलिकेची ट्युबल पेटेन्सी, लॅप्रोस्पोपी स्त्रीयांचे कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया तपासणी करुन मार्गदर्शन करण्यात आले. या मोफत तपासणी शिबीरात १२७ जणांची तपासणी केली. सुत्रसंचालन अनिल मेहेर यांनी केले. सतिष लोढा यांनी आभार मानले.