मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
152

‘मृत समुद्र’ म्हणजे काय?


मृत समुद्र मध्य पूर्वेत आहे. तो इस्रायल व जॉर्डन यांच्या सीमेवर आहे. या समुद्राच्या पाण्यास बाहेर पडायला वाव नाही. खरं तर ते महाप्रचंड सरोवरच आहे. यात वार्‍याने येणारे क्षार, पाण्याबरोबर येणारे क्षार यांची भर पडते. हे प्रमाण इतके असते की त्यामुळे या सागराच्या पाण्यात कुठलाही सजीव जिवंत राहू शकत नाही. म्हणून या सागराला ‘मृत समुद्र’ असे म्हणतात. मृत समुद्र ७७ कि. मी. लांब आहे. त्याची जास्तीत जास्त रुंदी २० कि. मी. आहे. या सागरपृष्ठाची पातळी जागतिक सागर पातळीच्या ३९६ मीटर खाली आहे. या सागराला जॉर्डन नदी येऊन मिळते. शिवाय इतर छोटे-मोठे नालेही मिळतात. यातून फक्त बाष्पीभवनाने जे पाणी जाईल तेवढेच. त्यामुळे क्षार वाहून जायला मार्ग उरत नाही. यामुळे मृत समुद्रात २३ ते २५% क्षार आढळतात. या समुद्रातून पोटॅश, मॅग्नेशियम लोराइड, कॅल्शियम लोराइड आणि ब्रोमाइड आदी क्षार काढले जातात.