गुजराथी मैसूर

0
130

गुजराथी मैसूर

साहित्य – बेसन पीठ एक कप, साखर
पाऊण कप, तूप दीड कप, पाणी पाकासाठी
एक तृतीयांश कप, दूध एक टेबलस्पून, तूप,
रवा काढण्यासाठी दोन चहाचे चमचे, एक
चमचा वेलदोडे.
कृती – दूध व दोन चमचे तूप एकत्र
करून डाळीच्या पिठाला हाताने चोळावे.
रव्याच्या चाळणीने चाळावे. एक कप पिठाचे
अर्धा कप रवा होतो. मेसूर दुपारी करावयाचा
असेल तर सकाळी असा रवा करून घ्यावा.
मैसूर करावयाच्या वेळी प्रथम हा रवा दोन
चमचे तुपावर गुलाबी भाजावा. साखरेचा
दोनतारी पाक करावा. त्यात भाजलेला रवा
घालून दोन मिनिटे ढवळावे. मग त्यावर
कडकडीत गरम केलेल्या दीड कप तुपाची
धार करून मिश्रण ढवळत राहावे. थोडा
वेळाने मिश्रण पितळी चाळणीत ओतावे.
त्यावर गार पाण्याचे शिंतोडे शिंपडावे म्हणजे
जाळी चांगली सुटते. वड्या कापून कोमट
असतानाच काढाव्यात.