दैनिक पंचांग मंगळवार, दि. ७ मे २०२४

0
176

दर्श अमावास्या, सत्तु अमावास्या, शके
१९४६ क्रोधीनामसंवत्सर, चैत्र कृष्णपक्ष,
अश्विनी १५|३२
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६
वा. २९ मि.

राशिभविष्य

मेष : आपल्या स्वभावात नम्रता आणण्याचा प्रयत्न करा कटू शब्दांचा उपयोग आपल्यासाठी अडचणी निर्माण करू शकतात. बर्‍याच दिवसांपासून राहिलेली खरेदी होईल.

वृषभ : आज आपणास आपल्या विचारांबरोबर एकटे राहून आपले दैनंदिन कार्यक्रम थांबविणे आवश्यक आहे. मागील उधारी व उसनवारी वसूल होईल.

मिथुन : आज वादांमुळे आपणास निष्कारण ताण असल्याचा अनुभव येईल. कौटुंबिक पाठिंबा देखील मिळणार नाही. मित्र
व नातेवाईकांचा सहवास लाभेल.

कर्क : वाहने अधिक काळजीपूर्वक चालवा. मित्रांचे सहकार्य मिळाल्याने महत्त्वाची कार्य पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील. घराच्या बांधकामाचा प्लॅन आज तयार करा.

सिंह : आर्थिक विषयांमध्ये आपले प्रयत्न आपणास यश मिळवून देतील. आपणास वरिष्ठ अधिकार्‍यांकडून समर्थन मिळेल.
‘अतिपरिचयात अवज्ञा’ चा अनुभव येईल.

कन्या : कला क्षेत्रात यश मिळण्याची शयता आहे. आपणास नवे वाहन मिळण्याची शयता आहे. मानसन्मानात वाढ होईल. काहींना स्पर्धात्मक यश मिळेल.

तूळ : आज आपणास कठोर श्रम करावे लागेल. काही निष्कारण चिंतांमुळे आपली व्यग्रता वाढेल. वाहने व उपकरणे जपून वापरावीत. कामात काही विघ्न येऊ शकतात. अधिक जोखमीचे कार्ये टाळा.

वृश्चिक : आपला जोडीदार आपणास भावनात्मक पाठबळ देईल. एखाद्या महत्त्वाच्या
व्यक्तीशी भेट आपल्यासाठी आनंदाची ठरेल. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. अधिकार्‍यांपासून दूर राहा.

धनु : धार्मिक कार्यांमध्ये खर्च होण्याची शयता आहे. आजचा दिवस कालच्या दिवसापेक्षा चांगला नसेल. पाठबळ मिळेल.
मनाला प्रसन्नता वाटेल. आरोग्य नरम-गरम राहील.

मकर : मित्रांमध्ये होणारे वाद आपल्या संबंधासाठी वाईट ठरतील. मानसिक स्थिती
आल्हाददायक राहील. संततीसौख्य लाभेल. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. व्यापारय्व्यवसायिकांना दिवस संमिश्र.

कुंभ : वरिष्ठांबरोबर संपर्कात आल्याने प्रसन्न वातावरण राहील. नवीन संधी मिळतील. आरोग्याची काळजी घ्या. नवीन वाहन खरेदीचे योग आहेत. व्यापारात वेळ मध्यम राहील.

मीन : व्यस्त राहाल. कौटुंबिक विषयां मध्ये पैसा खर्च होईल. इतर लोकांना आपल्या इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आरोग्याची काळजी घ्या. अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर