नगर – अखंड मराठा समाज व मराठा सोयरीक संस्थेच्या
माध्यमातून अशोक कुटे व त्यांच्या टीमने १०० वधु वर मेळावे घेऊन
मोठे पुण्याचे काम केले आहे, असे उद्गार अहिल्यानगर शिवसेना
जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी
काढले.
अखंड मराठा समाज व मराठा सोयरीक संस्था यांच्या संयुक्त
विद्यमाने आयोजित १०० वा मोफत मराठा वधु वर परिचय मेळावा नगर
शहरात हॉटेल यश ग्रॅण्ड येथे उत्साह मध्ये पार पडला. या मेळाव्यामध्ये
संस्थेने तयार केलेल्या अत्याधुनिक अशा वेबसाईट व मोबाईल अॅपचे
उद्घाटन रीलस्टार सनी सकट व जान्हवी लटके यांच्या हस्ते करण्यात आले.
मेळाव्यासाठी रमाकांत गाडे, महेश गाडे, सिन्नरमधील प्राध्यापक राजाराम मुंगसे,
संचालिका जयश्री कुटे, पारुनाथ ढोकळे, उद्योजक शरद ठाणगे, मधुकर निकम, हरिश्चंद्र
दळवी, सयाजी निमसे, गोरक्षनाथ पटारे, मनोज सोनवणे, शशिकांत भांबरे, शांतीलाल
कोहक, अनिल अकोलकर, प्रमोद झावरे, प्रा. योगेश कोतकर, संगीता ठुबे, मंदा कोतकर
इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.
आज काल एक लग्न जमवणे म्हणजे खूप अवघड असते,
अशावेळी अशोक कुटे व त्यांच्या टीमने ५००० पेक्षा जास्त लग्न जमवले
व त्यामध्ये ५००० पैकी ५६७ लग्न हे विधवा, विदूर, घटस्फोटीत
यांचे जमवले ही विशेष गोष्ट आहे असे उद्गार सिन्नरचे मराठा सेवा संघ
तालुका अध्यक्ष प्रा. राजाराम मुंगसे सर यांनी काढले.
मेळाव्यास विविध जिल्ह्यातून वधू वर पालक उपस्थित होते.
सर्वांचे बायोडाटा वाचन जयश्री कुटे यांनी केले. विविध स्थळांची
माहिती फोन नंबरसह सर्वांना देण्यात आली.
सूत्रसंचालन हरिश्चंद्र दळवी यांनी केले. पारुनाथ ढोकळे यांनी
आभार मानले. जे मेळाव्यासाठी येऊ शकले नाहीत त्यांनी ८८४७७२४६८० या क्रमांकावर
संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.