तरूण पिढी मोठ्या प्रमाणात जैन मंदिर, जैन तीर्थस्थळी आल्यास त्यांच्यात चांगले संस्कार रूजण्यास मदत : सुभाष मुथा
नगर – समाजातील
तरूण पिढी मोठ्या प्रमाणात
जैन मंदिर, जैन तीर्थस्थळी
आल्यास त्यांच्यात चांगले संस्कार
रूजण्यास मदत होईल. समाजात
धार्मिकता वाढली, साधू संतांचे
विचार अंगिकारले तर खर्या
अर्थाने प्रत्येकाला वैयक्तिक तसेच
सामाजिक जीवनातही आनंदाने
राहता येईल. यासाठी उपासना
महत्त्वाची आहे. यासाठी मंदिरांची
निर्मिती झाली, जिर्णोद्धार होत
असेल तर त्याला समाजातील
दानशूरांनी सढळ हाताने देणगी दैऊन पुण्याचे काम करावे. त्यामुळे येणार्या नवीन
पिढीसाठी एक आदर्श निर्माण होईल, असे प्रतिपादन कापड बाजार जैन मंदिराचे
अध्यक्ष सुभाष मुथा यांनी केले.
आचार्य भगवंत श्री विश्वकल्याण सुरीश्वरजी महाराजा साहेब आदि ठाणा यांच्या
निश्रामध्ये श्रीगोंदा जैन मंदिर जिर्णोद्धाराचे काम सुरू आहे. या कामासाठी सुभाष मुथा
यांच्या हस्ते ९ लाखांचा धनादेश प्रथम तीर्थंकर श्री आदेश्वर भगवान जैन मंदिर,
श्रीगोंदाचे अध्यक्ष दिलीपभाई मेहता यांना देण्यात आला. यावेळी ट्रस्टी मणिकांतभाई
भाटे, जयकुमार पुंगलिया, डॉ. सागर पटवा, महेंद्रभाई मेहेर, संजय बेदमुथा, जितेंद्र
पोरवाल इत्यादी ट्रस्टी उपस्थित
होते. मंदिराचे दुरुस्ती काम
आणि जिर्णोद्धारासाठी जैन मंदिर
कापड बाजार ट्रस्ट तर्फे ९ लाख
रुपयांचा धनादेश देणगी म्हणून
देण्यात आला. राजस्थान मकराना
येथील कुशल कारागीर सुंदर
नक्षीकाम करून म़ंदिराचे काम
करत आहेत.
सुभाष मुथा पुढे म्हणाले
की, नगर – पुणे रस्त्यावरील
सुपा (ता. पारनेर) येथील श्री
चंद्रप्रभू स्वामी जैन मंदिराचे
नूतनीकरण, कोल्हार येथील कैवल्यधाम जैन तीर्थस्थळ, जामखेड येथील नूतन मंदिर,
माणिकनगर जैन मंदिर, सोनई, नेवासा, वांबोरी, मिरजगाव इत्यादीसह विविध जैन
मंदिराच्या कामांसाठी तसेच गोसेवा म्हणून विविध गोशाळांना कायम देणगी देण्यात
येते. भविष्यात जैन मंदिरासाठी जी मदत लागेल ती देण्याचा प्रयत्न राहील. कारण
नगरमधील कापडबाजार जैन मंदिर हे शहरातील व जिल्ह्यातील सर्व जैन मंदिरांसाठी
थोरल्या भावासारखे असून याच कर्तव्य भावनेतून वेळोवेळी इतर जैन मंदिरांना देणगी
देण्यात येते. समाजातील इतर ट्रस्ट व खाजगी व्यक्तींनी पूढे येत या धर्म कार्यास
हातभार लावावा असे आवाहन सुभाष मुथा यांनी केले आहे.