नगर – पंडित दीनदयाल उपाध्याय
यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित
केलेल्या विविध स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील
१६००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी विक्रमी संख्येने
सहभाग नोंदविला असून अहिल्यानगर जिल्ह्यासाठी
ही भुषणावह बाब आहे, असे प्रतिपादन पंडित
दीनदयाल उपाध्याय एकात्म मानव दर्शन हीरक
महोत्सवी वर्ष समितीचे सदस्य विनायकराव देशमुख
यांनी केले.
पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्ताने
आयोजित करण्यात आलेल्या इंजीनियरिंग,
पॉलीटेक्निक व फार्मसी महाविद्यालयाच्या
गटातील जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन शासकीय
तंत्रनिकेतन, अहिल्यानगर येथे करण्यात आले होते.
याप्रसंगी श्री. देशमुख बोलत होते.
यावेळी समितीचे सदस्य राजाभाऊ मुळे,
शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. अजय आगरकर,
परीक्षिका प्रा. शुभांगी कुंभार, प्रा. आश्लेषा भांडारकर,
प्रा. सीमा आगरकर इत्यादी उपस्थित होते. प्रारंभी पंडित दीनदयाल उपाध्याय व
भारत मातेच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना श्री. देशमुख म्हणाले, जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाने व पुढाकाराने जिल्ह्यात दीनदयाल
उपाध्याय यांचे विचार समाजाच्या विविध स्तरापर्यंत पोचवण्यासाठी मोहीम हाती
घेण्यात आली आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील विद्यार्थी विक्रमी संख्येने या उपक्रमांमध्ये
सहभागी होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली प्रथम पंतप्रधान पदाची
शपथ घेतल्यानंतर केलेल्या भाषणात माझे सरकार पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या
अंत्योदयाच्या संकल्पनेवर काम करेल अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार मागील
अकरा वर्षात मोदी सरकारने समाजातील
सर्वात शेवटच्या घटकाच्या उन्नतीसाठी
अनेक क्रांतिकारक योजना राबविल्या
आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने उज्वला योजना, घरकुल
योजना, आरोग्य विमा योजना, पीएम किसान योजना
आदींचा समावेश आहे. या योजना समाजातील गरजू
आणि गरीब लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी
प्रयत्न करणे आवश्यक आहे आणि हेच खरे पंडित
दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन ठरेल.
राजाभाऊ मुळे बोलताना म्हणाले, अत्यंत
प्रतिकूल परिस्थितीत बालपण गेलेले असतानाही
कुशाग्र बुद्धिमत्तेच्या दीनदयाल यांनी आपले आयुष्य
राष्ट्राच्या उन्नतीसाठी समर्पित केले. तरुणांनी त्यांचे
विचार समजुन घेऊन आपल्या जीवनात त्याचा
अंगीकार करावा. या माध्यमातूनच स्वतःची आणि
राष्ट्राची प्रगती होईल आणि देश विश्व गुरू बनेल.
प्राचार्य डॉ. अजय आगरकर बोलताना
म्हणाले, जिल्ह्यातील ४० पेक्षा जास्त अभियांत्रिकी
महाविद्यालये, तंत्रनिकेतने व औषध शास्त्र महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी आज
स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. आगामी वर्षभर पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या
विचारांच्या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार
असून या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी असाच मोठा सहभाग घ्यावा.
पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रथम संस्थास्तरावर
व आता जिल्हा जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व पोस्टर बनवा स्पर्धांचे
आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शासकीय तंत्रनिकेतन चे प्रकल्प अधिकारी डॉ.
दादा करंजुले यांनी व अन्य सहकार्यांनी परिश्रम घेतले.