डॉ.विखे पाटील अभियांत्रिकी कॉलेजमध्ये डीप लर्निंग विथ पायथन विषयावर कार्यशाळा

0
22

नगर – विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये डीप लर्निंग विथ पायथन प्रोग्रॅमिंग या विषयावर तीन दिवसीय हॅन्ड्स ऑन ट्रेनिंग कार्यशाळा नुकतीच झाली. ही कार्यशाळा माहिती तंत्रज्ञान विभाग आणि संगणक
शास्त्र व डिझाईन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेचे मार्गदर्शन पुणे येथील मितू टेक्नॉलॉजीजचे संस्थापक तुषार कुटे यांनी केले.

कार्यशाळेत विद्यार्थ्यांना डीप लर्निंग टेक्नॉलॉजीची मूलभूत माहिती, डीप न्यूरल नेटवर्क्सची रचना व प्रशिक्षण तसेच सी एन एन आणि डीप न्यूल नेटवर्क्समधील प्रगत संकल्पनांची सखोल माहिती देण्यात आली. टेन्सरफ्लो, केरस, पायटॉर्च
आदी पॅकेजेसचा अभ्यास, इमेज क्लासिफिकेशन, ऑटोएन्कोडर वापरून अनामोली डिटेकशन, आर एन एन व सी एन एन मॉडेल्सची बांधणी, तसेच ट्रान्सफर लर्निंग वापरून ऑब्जेक्ट डिटेकशन यांसारख्या विषयांवर प्रत्यक्ष प्रात्यक्षिके घेण्यात आली. या कार्यशाळेसाठी प्रा.प्राची मोरे व प्रा.प्राजक्ता डोलारे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ.डी.ए. विधाते, कॉम्पुटर सायन्स चे विभाग प्रमुख डॉ.आर.एस.तांबे, प्राचार्य डॉ.आर.आर.नवथर, तांत्रिक संचालक प्रा.सुनील कल्हापुरे यांचे मार्गदर्शन लाभले.

ही कार्यशाळा विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना डीप लर्निंगच्या आधुनिक तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष अनुभवातून ओळख करून देणारी ठरली. या कार्यशाळेमध्ये एकूण १०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला प्रमाणपत्र प्रदान करण्यात
आले तसेच त्यांनी व्यक्तिगत प्रकल्पही यशस्वीरीत्या पूर्ण केले. या कार्यशाळेसाठी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे डायरेक्टर (टेक्निकल) प्रा.सुनिल कल्हापुरे, सेक्रेटरी जनरल डॉ. पी.एम. गायकवाड, चिफ एक्झीक्युटीव्ह ऑफीसर, डॉ. सुजय विखे पाटील, मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले.