नगर – अहिल्यानगर येथील अनाहत एक कलासृष्टी या संस्थेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त अभंगवारी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रतिसाद मिळाला. या प्रतिसादानंतर कार्यक्रमाचे
दिग्दर्शक प्रा. प्रसाद बेडेकर यांनी या कार्यक्रमाचे प्रयोग महाराष्ट्रात व्हावेत असा मानस व्यक्त केला. त्यानुसार कार्तिकी एकादशी निमित्त साधत अभंगवारी कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये करण्यात येणार आहे. त्याचा
लोगो अनावरण सोहळा अहिल्यानगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती येथे उद्योजक नरेंद्र फिरोदिया, रवींद्र चिपळूणकर, अजिंक्य सुरवसे, युवराज सर, अभय आगरकर, श्री. खरपूडे, विलास बडवे, चंद्रकांत पंडित, योगेश पंडित, दिलीप पंडित यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमात अभिजित अपस्तंभ, ओंकार देऊळगावकर, सौ.
अनुजा कुलकर्णी, सौ. अमृता बेडेकर, सौ.रश्मी गंधे, सौ. श्रेया सुवर्णपाठकी हे कलाकार गायन करणार असून सौरभ साठे, आनंद कुलकर्णी, प्रसाद सुवर्णपाठकी, संकेत सुवर्णपाठकी हे कलाकार साथसंगत करणार आहेत. प्रा. प्रसाद
बेडेकर या कार्यक्रमाचे निरूपण आणि दिग्दर्शन करणार आहेत. लवकरच कार्यक्रमाच्या तारखा जाहीर केल्या जातील.
उद्योजक नरेंद्र फिरोदिया व रवींद्र चिपळूणकर यांनी हा कार्यक्रम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर व्हावा अशा अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. अनाहतचे अध्यक्ष प्रसाद सुवर्णपाठकी यांनी आभार मानले.