मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला अहमदनगर जिल्ह्यास निधी उपलब्ध करून द्यावा

0
16

नगर – मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळास अहमदनगर जिल्ह्याला निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पारनेर दौर्‍यावर असताना राम-रहीम बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठानाचे अध्यक्ष
रफिक शेख (मेजर) यांनी त्यांची भेट घेऊन केली. यावेळी आमदार काशिनाथ दाते, जिल्हाधिकारी पंकज
आशिया, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, भाजपा तालुकाध्यक्ष वसंत चेडे, दिलीप दाते, नियाज राजे, रियाज राजे, किरण कुबडे, इमरान शेख, आवेज राजे, रेहान राजे आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी निधी उपलब्ध करून देतो, माझ्याकडून व्यत्यय उशिर होणार नाही असं लगेच आदेशच दिला.  प्रत्येक समाजाच्या कामासाठी तळतळीने,
जात धर्माच्या पलिकडे जाऊन समाजसेवा व मानवता हाच खरा ध र्म माणुन काम करणारे व झटणारे असे माजी सैनिक रफिक शेख यांनी अजीत पवार यांना निवेदन देऊन माहिती दिली की, सैनिकांना सन १९७१ मध्ये सिलीगची जागा
वाटप झाली होती. त्या जागेला ५५ वर्षे झाली तरी ताबा माजी सैनिकांचा नाही. त्या जागेवर काही लोकांनी अतिक्रमण केलेले आहे. दादांनी जिल्हाधिकारी यांना आमच्या समोरच हे काम तात्काळ करून द्या असा आदेश दिला असल्याचे
रफीक मेजर यांनी सांगितले.