हातात कोयता घेवून दहशत करणार्‍याला पोलिसांनी पकडल

0
18

नगर – हातात कोयता घेवून परिसरात दहशत करत फिरणार्‍या तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी बोल्हेगाव फाटा परिसरात पकडले आहे. ३ ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली. रवि ज्ञानेश्वर साळुंके (वय २९, रा शिंदे कॉलनी,
बोल्हेगाव फाटा) असे आरोपीचे नाव आहे. स.पो.नि. माणिक चौधरी यांना माहिती मिळाली की, बोल्हेगाव फाटा येथे एक इसम हातात लोखंडी धारदार कोयता घेवुन दहशत करत फिरत आहे. ही माहिती मिळताच त्यांनी पोलिसांचे पथक
कारवाई साठी पाठविले. या पथकाने बोल्हेगाव फाटा येथे जावुन पाठलाग करुन रवि ज्ञानेश्वर साळुंके याला पकडले. त्याचे ताब्यातून एक धारदार लोखंडी कोयता काढून घेतला. त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई स.पो.नि. माणिक बी. चौधरी यांचे मार्गदर्शानाखाली स.फौ. राकेश
खेडकर, पो.हे.कॉ. संदीप पवार, राजु सुद्रीक, देविदास खेडकर, पो.कॉ. किशोर जाधव, नवनाथ दहिफळे, ज्ञानेश्वर आघाव, शेरकर यांचे पथकाने केली आहे.