नगर – हिंद-कि चादर’ श्री गुरू
तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या
शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त संपूर्ण
राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने
गुरुद्वारा धुबरी साहिब आसाम येथून
जिल्ह्यात येणार्या नगर कीर्तन यात्रेला सर्वो
तोपरी सहकार्य करावे. यात्रेला कुठल्याही
प्रकारची अडचण निर्माण होणार नाही
याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी
डॉ.पंकज आशिया यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात ’हिंद-कि चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी
यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आयोजित
आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ.आशिया बोलत होते.
बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, समाजकल्याण विभागाचे
सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.संदीप
पुंड, बलदेवसिंग वाही, सतिंदरसिंग नारंग, राजेन्द्रसिंग चावला, अश्विंदरसिंग मल्होत्रा,
हरप्रितसिंग नारंग, अमनदीपसिंग वाही, रविन्दरसिंग नारंग, अमरप्रित बलदेवसिंग वाही
आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.आशिया म्हणाले, श्री गुरू तेग बहादूर यांच्या शहिदीला
समर्पित नगर कीर्तन यात्रा ही छत्रपती संभाजीनगर येथून आपल्या जिल्ह्यात ८
ऑक्टोबर रोजी येणार आहे. यात्रा मार्गावरील रस्त्यांची आवश्यकते प्रमाणे डागडुजी
करण्यात यावी. शेंडी बायपास ते शहरातील गुरुद्वारापर्यंत बाईक रॅली काढण्यात येणार
असल्याने वाहतुकीला कुठलाही अडथळा
निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.
यात्रा मार्गावरील विद्युत तारा, वृक्षांच्या
फांद्यांचा यात्रेला अडथळा निर्माण होऊ
नये, यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही
करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी
दिल्या.
नगर किर्तन यात्रेविषयी माहिती
देतांना बलदेवसिंग वाही म्हणाले, ही
यात्रा गुरुद्वारा धुबरी साहेब, आसाम येथून
प्रारंभ झाली असून, श्री गुरु तेग बहादुर
साहेब जी यांच्या शहादतीचे महत्व व त्यांचे सार्वत्रिक संदेश यांचा प्रचार करण्यासाठी
भारतातील २३ राज्यांमधून प्रवास करीत आहे. या ऐतिहासिक यात्रेचा समारोप श्री
आनंदपूर साहेब, पंजाब येथे होणार आहे. यात्रेचे अहिल्यानगरमध्ये ८ ऑक्टोबर रोजी
दुपारी १२ वाजता आगमन होईल. गुरुद्वारा भाई दया सिंह जी, गोविंदपुरा हे एक
ऐतिहासिक गुरुद्वारा असून, या नगर कीर्तनाचे आयोजन त्यांच्या वतीने करण्यात आले
आहे. या प्रसंगी पारंपरिक गटका प्रदर्शन होणार असून, गुरुद्वार्यात कथा व किर्तन
कार्यक्रम श्री गुरु तेग बहादुर साहेब जी यांच्या शहादतीस समर्पित स्वरूपात आयोजित
केले हाणार असून सर्व उपस्थितांसाठी प्रसाद व लंगर सेवा आयोजित करण्यात आली
आहे. या ऐतिहासिक नगर कीर्तन प्रसंगी सर्वांना श्री गुरु ग्रंथ साहेब जी तसेच गुरु
साहेबान यांचे ऐतिहासिक शस्त्रांचे दर्शन घेण्याची संधी लाभणार असल्याची माहितीही
त्यांनी यावेळी दिली.
बैठकीस संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते