विजेता करंडक क्रिकेट स्पर्धेचे माहिती पत्रक व प्रवेश अर्ज ग्रामदैवत श्री विशाल गणपतीस अर्पण

0
35

नगर – अहिल्यानगर मधील
वाडीयापार्क मैदानावर विजेता करंडक
क्रिकेट स्पर्धा ४ ते १४ डिसेंबर
या कालावधीत होणार आहेत. डे
अ‍ॅण्ड नाईट पद्धतीने होणार्‍या या
स्पर्धेत मोजक्या संघाना प्रवेश दिला
जाणार आहे. स्पर्धेतील विजेत्या
संघास रुपये १ लाख, करंडक व
उपविजेत्या संघास रुपये ७१ हजार
व करंडक तसेच इतर हजारो रुपयांची
पारितोषिके देण्यात येणार आहे, अशी
माहिती माजी नगरसेवक विपुल शेटिया
यांनी दिली.
या स्पर्धेची नोंदणी सुरु करण्या
आधी याचे माहिती पत्रक व प्रवेश
अर्ज ग्रामदैवत श्री विशाल गणपतीच्या
चरणी मंदिराचे महंत संगमनाथ महाराजांच्या हस्ते अर्पण करून श्री
गणेशाची आरती केली. यावेळी जैन कॉन्फरन्सचे मार्गदर्शक अशोक
बोरा, मर्चंट बँकेचे संचालक कमलेश भंडारी आदींसह क्लबचे सदस्य
उपस्थित होते.
या स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेट स्पर्धांप्रमाणे
आरटीएम कार्ड, डिआरएस रीव्ह्युव सिस्टिम तसेच इम्पॅक्ट प्लेअर,
थर्ड अंपायर अशा नियमांचा समावेश करत आहोत. हे या स्पर्धेचे
वैशिष्ट्य आहे. या स्पर्धेतील सर्व सामन्यांचे युट्युब वर थेट प्रक्षेपण
होणार आहे. या पूर्ण स्पर्धेमध्ये खेळाडू जेवढे षटकार मारतील
तेवढे झाडे क्लबच्या वतीने लावून व संगोपन करण्याचा सामाजिक
जाणीवेतून उपक्रम दरवर्षी राबवण्यात येतो.
अधिक माहितीसाठी हर्ष बोरा मोबाईल नंबर ९६८९३९७०२९
येथे संपर्क साधावा. क्रिकेट स्पर्धांचा आनंद घ्यावा, असे आवाहन
विजेता क्रिकेट क्लबचे अमोल शिंगी व संयोजकांनी केले आहे.