नगर – पंडित दीनदयाळ पतसंस्था व पंडित दीनदयाळ परिवार प्रतिष्ठानच्यावतीने मागील वर्षी झालेल्या निबंध स्पर्धेचे
पतसंस्थेच्या वार्षिक सभे प्रसंगी पारितोषिक वितरण करण्यात आले. याप्रसंगी पतसंस्थेचे संस्थापक, चेअरमन वसंत
लोढा, व्हाईस चेअरमन सुधीर पगारिया, मानद सचिव विकास पाथरकर, ज्येष्ठ संचालक मिलिंद गंधे, संचालक शैलेश
चंदे, निलेश लोढा, श्रीमती शैला चंगेडे, संचालिका शारदा होशिंग, सुभाष फणसे, बाबासाहेब साठे, व्यवस्थापक निलेश लाटे, उपव्यवस्थापक सुखदेव दरेकर आदी उपस्थित होते. स्पर्धेचे विजेते शालेय गट (नववी ते बारावी) प्रथम
क्रमांक – आशुतोष भागवत, महाविद्यालयीन गट., प्रथम क्रमांक- निकीता देशमुख, द्वितीय क्रमांक -चैतन्य खांदाट,
तृतिय क्रमांक -मनोज शिंदे, खुला गट., प्रथम क्रमांक – हरिश्चंद्र धिगळे, द्वितीय क्रमांक – मनाली नागुल, तृतीय क्रमांक
-अमिता अकोलकर यांना पारितोषिके देण्यात आली. प्रथम क्रमांक रोख पाच हजार रुपये, द्वितीय क्रमांक तीन हजार रुपये, तृतीय क्रमांक दोन हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते.