युरॉलॉजी एम सी एच सुपरस्पेशॅलिटी परीक्षेत नगरचे डॉ. स्वनित देशपांडे महाराष्ट्रात प्रथम

0
32

नगर – देशपांडे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, आनंदी बाजार
येथील युरॉलॉजीस्ट (मूत्र विकार तज्ज्ञ) डॉ. स्वनित देशपांडे यांनी एम
सी एच युरॉलॉजी सुपरस्पेशालिटी पदवी परीक्षा २०२५ मध्ये महाराष्ट्रात
सर्वप्रथम क्रमांक मिळवत उत्तीर्ण केली.
त्यांनी सुपरस्पेशालिटीचा अभ्यासक्रम मुंबईतील बृहन्मुंबई
महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सायन हॉस्पिटल येथे पूर्ण केला.
त्यांनी एम बी बी एस पदवी मुंबईतील के ई एम हॉस्पिटल (प्रवेश
परीक्षेत महाराष्ट्रात १० वा क्रमांक), तसेच एम एस जनरल सर्जरी
हि पदवी मुंबईतील नायर रुग्णालयातून प्रथम क्रमांकाने आणि विशेष
प्रावीण्याने मिळवली. २०२४ मध्ये एडीनबर्ग, युनाइटेड किंग्डम मधील
रॉयल कॉलेज ऑफ इंग्लंड ची एम आर सी एस हि पदवी त्यांनी प्राप्त केली. तसेच
अखखचड सुपरस्पेसिलीटी प्रवेश परीक्षेत त्यांनी भारतात ९ व क्रमांक मिळवला.
या उल्लेखनीय कामगिरी मुळे त्यांना युरॉलॉजिकल असोसिएशन ऑफ इंडिया
तर्फे त्यांना आंतरराष्ट्रीय प्रवासी शिष्यवृत्ती मिळाली. त्यांना २०२५ च्या नेवाडा
मधील अमेरिकन युरॉलॉजिकल असोसिएशन परिषदेत त्यांना भारताचे प्रतिनिधित्व
करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले.
त्यानंतर युरॉलॉजीसाठी जगात प्रसिद्ध असणार्‍या युनिव्हर्सिटी
ऑफ कॅलिफोर्निया सॅन डिएगो येथे त्यांनी फिमेल युरॉलॉजिमध्ये
ऑबसेर्व्हरशीप केली. येथे त्यांनी स्त्रियांच्या रजोनिवृत्ती नंतर नकळत
लघवी होण्याच्या जटिल समस्यांवरील अत्याधुनिक शस्त्रक्रिया, रोबोटिक
सर्जरी सारख्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया-तंत्रज्ञच अभ्यास केला.
तसेच जगप्रसिद्ध सेक्शुअल मेडिसिन तज्ज्ञ डॉ. अर्विन गोल्डस्टीन
यांच्या मार्गदर्शनाखाली विविध लैंगिक समस्यावरील शास्त्रोक्त उपचार
आणि शस्त्रक्रियांचा त्यांनी अभ्यास केला. त्यानंतर ट्यूसॉन, ऍरिझोना
येथे प्रोस्टेट ग्रंथीच्या सर्व दुर्बिणीच्या शस्त्रक्रिया आद्ययावत लेसर तंत्रज्ञानाने करण्याचा
अभ्यास त्यांनी केला. त्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल ‘सर्वोत्कृष्ट निवासी
डॉक्टर’ हा पुरस्कार सायन हॉस्पिटल तर्फे देण्यात आला. डॉ. स्वनित देशपांडे हे
नगर मधील लॅपरोस्कोपिक सर्जन डॉ. हेमंत देशपांडे आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रीती
देशपांडे यांचे चिरंजीव आहेत.