छावणी परिषदच्या वतीने भिंगारमध्ये स्वच्छता अभियान

0
60

नगर – भिंगार छावणी परिषदच्या वतीने स्वच्छता ही सेवा! अभियानातंर्गत भिंगार
शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाद्वारे
प्लास्टिक मुक्तीचा संदेश देऊन, नागरिकांमध्ये सार्वजनिक
स्वच्छतेबद्दल जागृती करण्यात आली.
या स्वच्छता अभियानात भिंगार छावणी परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे व नामनिर्देशित सदस्य वसंत राठोड
यांनी हातात झाडू घेऊन सहभाग घेतला. त्यांच्या सोबत कार्यालय
अधिक्षक स्नेहा पारनाईक, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक रमेश साके,
गणेश भोर स्वच्छाता निरिक्षक, लेखापाल सुनिल शिंदे, निवासी
वैद्यकीय अधिकारी डॉ. गीतांजली पवार, मुख्याध्यापक संजय शिंदे,
ठेकेदार राजेश काळे, तसेच छावणी परिषदेच्या विविध विभागातील
अधिकारी-कर्मचारी, सर्व सफाई कर्मचारी, हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सर्व
सदस्य, नागरिक तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांनी
सक्रिय सहभाग घेतला.
भिंगार छावणी
परिषदेच्या वतीने १९ सप्टेंबर
ते २ ऑक्टोबर रोजी या कालावधीत स्वच्छता ही सेवा! अभियान
सुरू आहे. त्यानुसार २५ सप्टेंबर रोजी शहरातील प्रमुख ठिकाणी
स्वच्छता मोहिम राबविण्यात आले. या अंतर्गत नगर तालुका पोलीस
स्टेशन परिसर, शुक्रवार बाजार परिसर व इतर सार्वजनिक ठिकाणी
साफसफाई करण्यात आली.
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने साथीचे आजार टाळण्यासाठी
सार्वजनिक ठिकाणांची नियमित स्वच्छता, नालेसफाई व औषध
फवारणी यासारखी कामेही छावणी परिषदेच्या माध्यमातून सातत्याने
सुरू आहेत. हे अभियान यशस्वी करण्यासाठी छावणी परिषदेचे
सर्व कार्यालयीन कर्मचारी, शालेय कर्मचारी, रुग्णालयातील कर्मचारी
यांच्यासह स्थानिक स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटनांनी परिश्रम
घेतले.