नगर – छावणी परिषदेच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमांतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे, मनोनीत
सदस्य वसंत राठोड, स्वच्छता निरीक्षक रमेश साके व गणेश भोर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेबाबत . जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. या माध्यमातून नागरिकांमध्ये स्वच्छतेची भावना दृढ करण्यावर विशेष भर दिला जात आहे.
याचाच एक भाग म्हणून छावनी
परिषदेच्या पीएमश्री डॉ. बाबासाहेब
आंबेडकर शाळेतील विद्यार्थ्यांनी शुक्रवार
बाजार येथे पथनाट्याद्वारे स्वच्छतेचा संदेश
जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. हा
उपक्रम सीएसआरडीचे प्राध्यापक सँम्युअल
वाघमारे व मुख्याध्यापक संजय शिंदे यांच्या
मार्गदर्शनाखाली पार पडला.
या पथनाट्यात सिएसआरडी
महाविद्यालयाचे विद्यार्थी श्रुती थोरात, पवन
गोरे, संकेत केदारी, प्रज्ञा साळवे, नेहा
शेटे, सम्शा खातून यांच्यासह पीएमश्री डॉ.
बाबासाहेब आंबेडकर शाळेचे विद्यार्थी सिफत
शेख, मसिरा शेख, हर्षदा जाधव, स्लालेहा
सय्यद, सायमा शेख, दिव्या जगताप,
सिमरन खान, गायत्री शिंदे, अर्पिता शेंडे,
ढोलकी वादक ओंकार वाघमारे व सोहम
शेंडगे सहभागी झाले होते. काळू हिले, प्रशांत
आठवाल, मायकल
बनसोडे यांनी सहकार्य
केले.
विद्यार्थ्यांनी प्रभावी
अभिनय, संवाद आणि
घोषणांद्वारे परिसर
स्वच्छतेचे महत्त्व, घाण
न करण्याचे फायदे,
कचरा व्यवस्थापनाचे
नियम तसेच स्वच्छतेतून
आरोग्य जपण्याचा संदेश
जनतेपर्यंत पोहोचवला.
पथनाट्याचे सादरीकरण पाहणार्यांनी
उत्स्फूर्त दाद दिली. अनेक नागरिकांनी
विद्यार्थ्यांचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे
समाजात सकारात्मक बदल घडतो असे मत
व्यक्त केले.
छावणी परिषदेकडून स्वच्छता
पंधरवाड्यात स्वच्छता अभियानाशी निगडीत
विविध उपक्रम राबवले जाणार असून
विद्यार्थ्यांचा यात सक्रिय सहभाग राहणार
आहे.