गांधी ज्वेलर्स (पाबळवाला) यांच्या ज्वेलरी प्रदर्शनाचे उद्घाटन

0
43

नगर – अहिल्यानगरकरांनी उत्साहाने
वाट पाहिलेले लक्ष्मी रोड, पुणे येथील गांधी
ज्वेलर्स (पाबळवाला) यांचे अहिल्यानगर येथील
आयरिश प्रिमिअर हॉटेलच्या हॉलमध्ये ज्वेलरी प्रदर्शन आयोजित
करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन २६ सप्टेंबर रोजी प्रमुख
पाहुणे रिंकू फिरोदिया, मेघना मुनोत, मनीषा गुगले, वैशाली चोपडा,
अलका बलदवा, श्रद्धा बिहानी, दीपा गुजरानी आणि अनीता सेठिया
यांच्या हस्ते रिबीन कापून करून करण्यात आले.
यावेळी विशेष पाहुणे म्हणून समृद्धी कांकऱिया कटारिया,
जिज्ञासा मुनोत, नमिता फिरोदिया, वैशाली गांधी, अनीता विपुल
सेठिया, आकांक्षा प्रतीक चोरडिया, शबनम धुप्पड, उज्वला लोढा व
प्रेरणा अनिल कोठारी उपस्थित होत्या.
पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, डिझायनर
ज्वेलरी आणि एक्सक्लुझिव्ह कलेक्शन
या खास आकर्षणांनी उपस्थितांना भुरळ
घातली. ब्रायडल, डायमंड आणि प्लॅटिनम
कलेक्शनमधील नवे ट्रेंड्स ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत, अशी
माहिती आयोजकांनी दिली.
गेल्या दहा वर्षांपासून प्रदर्शनांच्या माध्यमातून गांधी ज्वेलर्सने
निर्माण केलेला विश्वास, त्यांच्या गुणवत्तापूर्ण दागिन्यांमुळे व उत्कृष्ट
सेवेमुळे ग्राहक अधिकाधिक संख्येने भेट देत आहेत. हे प्रदर्शन २६,
२७ व २८ सप्टेंबर रोजीही सकाळी १० ते रात्री १० या वेळेत सुरू
राहणार आहे.
शुद्धता, आकर्षक डिझाईन्स आणि खास ऑफर्स यांचा लाभ
घेण्यासाठी अहिल्यानगरकरांनी या प्रदर्शनास नक्कीच भेट द्यावी, असे आवाहन
आयोजकांनी केले आहे