नगर – श्रीरामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशनच्या सेठ नंदलाल धूत इंग्लिश मीडियम स्कूल व मोहनलाल रामावतार मानधना ज्युनिअर कॉलेजमध्ये नवरात्रीच्या निमित्ताने विद्यार्थी व पालकांसाठी गरब्याचे आयोजन करण्यात आले
होते. जुनिअर कॉलेजमधील विद्यार्थी व त्यांच्या माता पालक यामध्ये उत्साहाने सहभागी झाले.
या कार्यक्रमास सौ. रिटा नंदकुमार झंवर प्रमुख पाहुण्या म्हणून
उपस्थित होत्या. विद्यार्थी व पालकांचे परीक्षण सौ. भक्ती प्रकाश
गांधी व सौ. गीता उमेश गिल्डा यांनी केले. या कार्यक्रमास सौ.
प्रतिभा श्रीगोपाल धूत उपस्थित होत्या. संस्थेचे उपाध्यक्ष व शाळा
समितीचे चेअरमन नंदकुमार झंवर व उपाध्यक्ष मोहनलाल मानधना
यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
हा उपक्रम अपराईज अॅकॅडमीचे सी ए उमेश डोडेजा यांच्या सहकार्याने घेण्यात आला. परीक्षकांनी
दिव्या राणे व जैनम मेहता या दोघांची उत्कृष्ट नृत्य तर माही डुंगरवळ या विद्यार्थिनीची उत्कृष्ट ड्रेपरी व कृपा पटेल
व तिची आई यांची उत्कृष्ट जोडी म्हणून निवड केली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन त्यांना
गौरवण्यात आले. विद्यार्थी व पालकांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाचा आनंद घेतला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्रीगोपाल धूत, उपाध्यक्ष राजेश झंवर, सचिव डॉक्टर कोलते, सहसचिव बजरंग दरक व सर्व पदाधिकार्यांनी शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक समन्वय व शिक्षकांनी कार्यक्रमाच्या पूर्णत्वासाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे संचलन श्रेयाकुमार गुंडू यांनी केले.