राज्यकर निरीक्षक व सहायक कक्ष अधिकारीपदी सौरभ लांडे यांची निवड

0
40

नगर – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत
घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत सौरभ लांडे यांनी
राज्यात सहाव्या क्रमांकाने यश संपादन केले. या
यशामुळे त्यांची निवड राज्यकर निरीक्षक व सहायक
कक्ष अधिकारी या पदांसाठी झाली आहे.
सौरभ लांडे यांचे शालेय व महाविद्यालयीन
शिक्षण हे अहिल्यानगर येथेच झाले. पुढे त्यांनी
छत्रपती संभाजीनगर येथील अभियांत्रिकी
महाविद्यालयातून बी.ई. (इलेक्ट्रिकल) पदवी
संपादन केली. शहरातील विभागीय डाकघरातील
स्टेनोग्राफर शिवाजी लांडे यांचे चिरंजीव
या कामगिरीबद्दल पोस्टल संघटनेतर्फे सत्कार
सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी
बोलताना पोस्टल संघटनेचे महाराष्ट्र व गोवा राज्याचे
कार्याध्यक्ष संतोष यादव म्हणाले की, सौरभ यांनी
स्पर्धा परीक्षेत मिळवलेले यश हे निश्चितच सर्वांसाठी
अभिमानास्पद आहे. सत्कार प्रसंगी सचिन थोरवे,
नामदेव डेंगळे, प्रदीप सूर्यवंशी, सुनील थोरात,
शिवाजी लांडे, नंदा लांडे, प्रतिक तनपुरे, विलास
कोतकरउपस्थित होते.