नगर – सीना नदीला मोठा पूर ल्याने या पुरात अडकलेल्या २५ ते ३० पूरग्रस्तांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी खा. निलेश
लंके हे एनडीआरएफ टीम सोबत पुराच्या पाण्यात उतरले होते. त्यांनी व एनडीआरएफ टीमने सुमारे ३ ते ४ तासांच्या
परिश्रमानंतर कर्जत तालुक्यातील मलठण गावात जिराफ वस्ती येथील या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात
यश मिळवले. सीना धरणाचा विसर्ग वाढल्यामुळे कर्जत तालुक्यातील निंबोडी, तरडगाव, मलठण तसेच जामखेड तालुक्यातील दिघी, फक्राबाद व चोंडी या गावांमध्ये पाणीपातळी वाढून मोठा पूर आला होता. कर्जत तालुक्यातील मलठण गावात जिराफ वस्ती म्हणून स्थित असणार्या भागाचा सीना नदीच्या महापुरामुळे संपर्क २२ सप्टेंबर रोजी रात्रीपासून तुटला होता. जवळपास २५ ते ३० लोक त्या ठिकाणी अडकल्याची माहिती २३ सप्टेंबर रोजी दुपारी खा. लंके यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी सर्व नियोजित कार्यक्रम सोडून कर्जत गाठले. प्रशासनाने तेथे तात्काळ एनडीआरएफच्या टीमला पाचारण केले. खा. लंके हे स्वत: एनडीआरएफ टीम सोबत पुराच्या पाण्यात उतरले. जवळपास तीन ते चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना त्या २५ ते ३० लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यश मिळाले.
पुराच्या पाण्यातून सुखरूप सुटका
झालेल्या प्रत्येक चेहर्यावरची दिलासा
देणारी स्मितरेषा, आईच्या कुशीत सुरक्षित
पोहोचलेली लेकरं,वृद्धांच्या डोळ्यात दाटलेले
आनंदाश्रू हे सर्व दृश्य मन हेलावून टाकणारे
होते. या कार्यात सहभागी सर्व एनडीआरएफ
जवान, अधिकारी व कार्यकर्ते यांना मनः
पूर्वक सलाम! अशी प्रतिक्रिया खा. लंके
यांनी या बचाव कार्यानंतर दिली.