नगर शहरासह जिल्ह्यात सलग २ दिवस पावसाचे थैमान, जनजीवन विस्कळीत

0
75

नगर – नगर शहरासह
जिल्ह्यात गेल्या २ दिवसांत
पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. २० सप्टेंबरला रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर २१ सप्टेंबरला
तर रात्रभर पाऊस कोसळत होता. त्यामुळे नगर – कल्याण महामार्गावरील सीना नदीला ७ दिवसात
तिसर्‍यांदा पूर आला त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. जिल्ह्याच्या अनेक भागातही
नदी, नाले तुडुंब भरून वाहत असून शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले आहे. दरम्यान, पुढील
काही दिवस भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी केलेला आहे.
२० सप्टेंबरला रात्री ८ वाजेपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली. शहराच्या बहुतेक भागात
या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रात्री आठ वाजेच्या सुमारास शहरात मुसळधार पावसाला
सुरुवात झाली. नालेगाव, बोल्हेगावसह सावेडी उपनगरात जोरदार पावसाने झोडपून काढले. आधीच
खड्डे असलेल्या मार्गावर वाहने चालवताना जोरदार पावसात वाहनधारकांना कसरत करावी लागली. २१
सप्टेंबरला दिवसभर पावसाने उघडीप दिली. मात्र सायंकाळी ७ च्या सुमारास पुन्हा जोरदार पाऊस सुरु
झाला. हा पाऊस रात्रभर कोसळत होता. त्यामुळे सीना नदीला मोठा पूर येवून नगर कल्याण रोडवरील
वाहतूक ठप्प झाली होती.
केडगाव, भिंगार, कापूरवाडी, चास, चिचोंडी पाटील मंडलांत अतिवृष्टी नगर शहर व तालुक्यात २१ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते २२ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजे
पर्यंतच्या २४ तासांत शहर व तालुक्यातील १२ महसुली मंडलांच्या पैकी केडगाव (७४.०मिमी),
कापूरवाडी (७१.५ मिमी), भिंगार (७२.३ मिमी), चास (७४.०मिमी), चिचोंडी पाटील (७२.० मिमी)
या ५ मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. शासनाच्या नियमानुसार ६५ मिमी किंवा त्या पेक्षा जास्त
पाऊस झाल्यास ती अतिवृष्टी समजली जाते.
याशिवाय नालेगाव मंडलात ५७.५ मिमी, नागापूर २१.३ मिमी, सावेडी ५४.०, वाळकी ५५.८,
रुईछ्त्तीसी ३८.३ मिमी, नेप्ती ५३.३ मिमी अशी नगर तालुक्यात सरासरी ५८.५ मिमी पावसाची नोंद
झाली आहे. २१ सप्टेंबर ला सकाळी संपलेल्या २४ तासांत वाळकी ६९.८ मिमी व रुईछ्त्तीसी ६८.३
मिमी अशी अतिवृष्टीची नोंद झाली
आहे.
पाथर्डी, जामखेड मध्ये ही अतिवृष्टी
जिल्ह्यात पाथर्डी (११०.५ मिमी) व जामखेड (६६.१ मिमी) या दोन तालुक्यात अतिवृष्टीची
नोंद झाली. याशिवाय नगर ५८.८ मिमी, पारनेर २२.३ मिमी, श्रीगोंदा ४६.७ मिमी, कर्जत ४५.६ मिमी,
शेवगाव ५६.९ मिमी, नेवासा २५.० मिमी, राहुरी ५.७ मिमी, श्रीरामपूर ४.८ मिमी, राहाता ६.० मिमी
असा पाऊस झाला आहे.
मान्सूनच्या ११४ दिवसात जिल्ह्यात १०८.३ टक्के पाऊस
मान्सूनच्या ११४ दिवसात जिल्ह्यात १०८.३ टक्के पाऊस झाला. आतापर्यंत ४४३.० मिमी पावसाची
नोंद झाली आहे. दरम्यान, पुढील काही दिवस भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यात पावसाचा येलो
अलर्ट जारी केला आहे. जून, जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरवली होती. त्यानंतर १४ ऑगस्टपासून
शहरासह जिल्ह्यात तुरळक व मध्यम स्वरुपाच्या पावसाला सुरुवात झाली होती, मात्र गेल्या आठवड्यात
झालेल्या पावसाने गेल्या ३ महिन्यातील तुट भरुन काढली होती. त्यानंतर पुन्हा सलग २ दिवस पाऊस
झाल्याने जिल्ह्यात आत्तापर्यंत १०८.३ टक्के पाऊस झाला आहे.
मे महिन्यातही झाला होता नगर परिसरात २९१.९ मिमी पाऊस
नगर तालुक्यात २७ मे रोजी चास आणि वाळकी मंडलात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता.
तसेच इतर ठिकाणीही पावसाने हजेरी लावली होती. मे महिन्यात नालेगाव मंडलात १५६.२ मिमी,
सावेडी २९६.७ मिमी, कापूरवाडी १९२.३ मिमी, केडगाव ३२३.४ मिमी, भिंगार २९०.६ मिमी, नागापूर
२७४.९ मिमी, जेऊर १८८ मिमी, चिचोंडी पाटील २८५.३ मिमी, वाळकी ३८२.८ मिमी, चास ४३०.३
मिमी, रुईछ्त्तीसी ३३९.८ मिमी, नेप्ती ३४१.२ मिमी. अशी नगर शहरासह तालुक्यात मे महिन्यात
सरासरी २९१.९ मिमी पावसाची नोंद झाली होती.