नगर – सभासदांच्या
विश्वासामुळे भिंगार अर्बन
बँक प्रगतीपथावर वाटचाल करत
आहे. बँकेच्या माध्यमातून आजपर्यंत
घेण्यात आलेल्या प्रत्येक निर्णयात
सभासदांचे व खातेदार आणि ठेवीदार
यांच्या हिताचे निर्णय घेतल्यामुळे
प्रत्येक व्यक्ती बँकेवर विश्वास ठेवत
आहे, आणि त्या विश्वासाला आम्ही
संचालक मंडळ कधीही तडा जाऊ
देणार नाही, अशी ग्वाही भिंगार अर्बन
बँकेचे चेअरमन अनिलराव झोडगे यांनी
दिली आहे.
भिंगार अर्बन को-ऑप बँक लि.ची
११७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा
भाग्यलक्ष्मी सांस्कृतिक भवन, भिंगार येथे खेळीमेळीचे
वातावरणात पार पडली. यावेळी बँकेचे व्हाईस चेअरमन
किसनराव चौधरी, संचालक राजेंद्र पतके, कैलासराव
खरपुडे, विष्णु फुलसौंदर, महेश झोडगे, माधव गोंधळे, रुपेश
भंडारी, कैलास रासकर, कैलास दळवी, एकनाथराव जाधव,
नामदेवराव लंगोटे, तिलोत्तमाबाई करांडे, अनिता भुजबळ,
रामसुख मंत्री, राजेंन्द्रबोरा, व्यवस्थापक शशिकांत महाजन व
सभासद उपस्थित होते.
पुढे बोलताना बँकेचे चेअरमन अनिलराव झोडगे यांनी
सभासदांचे स्वागत करतांना बँकेची आर्थिक स्थिती विषद
करतांना सांगितले की, अल्पावधीमध्ये बँकेने मोठी प्रगती
केली आहे. मार्च २०२५ अखेर बँकेला ऑडिट वर्ग ’अ’
मिळाला आहे. कर्जामध्ये वाढ झाली असून, वसुलीचे
कामही सक्षमपणे होत आहे, याचा मला सार्थ अभिमान
आहे. खातेदारांचा व सभासदांचा बँकेवर असलेल्या दृढ
विश्वासामुळेच ठेवीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. तसेच
युपीआय क्युआर कोड व मोबाईल बँकिंग सेवाही ही सर्व
शाखांमध्ये सुरु आहे
किसनराव चौधरी म्हणाले
की, भविष्यात बँकेच्या ठेवी. वाढविणेचे
उददीष्ट बँकेने ठेवले आहे. बँकेच्या आठ
शाखा सध्या चांगल्या प्रकारे कार्यरत
आहेत. सर्व शाखांमध्ये २४ तास ए.टी.एम.
सुविधा कॅश डिपॉझिटसह, आर.टी.
जी.एस./एन.ई.एफ.टी., लॉकर्स सुविधा
बाहेरगावचे डी.डी. सुविधा दिल्या जात
आहेत. सर्व शाखा ऑनलाईनने जोडल्या
आहेत. तसेंच, बँके मार्फत नजिकच्या
काळात मोबाईल बँकिंग सुविधा ग्राहकांसाठी
उपलब्ध करुन देण्यांत येणार आहे. तत्पर
सेवक वर्ग व माझे सर्व संचालक मंडळ
सचोटिने कामकाज करित आहेत.
यावेळी बँकेचे व्यवस्थापक शशीकांत महाजन यांनी सभेच्या
नोटीसचे वाचन करुन, नोटीसीतील विषयांना सभासदांची
मंजूरी घेतली. तसेच बँकेच्या वेगवेगळ्या योजनांचा फायदा
करून घेण्याचे आवाहन केले.
व्हा चेअरमन किसनराव चोधरी यांनी आभार मानले.
तसेच सहकार प्रशिक्षण केंदाचे वतीने सुनील साखरे यांनी
मार्गदर्शन केले. सभासद यांचे गुणवंत पाल्य यांचा विविध
क्षेत्रातील कामगिरीबद्दल यावेळी सन्मान करण्यात आला.