साध्वी महासती दिव्यदर्शन महाराज यांचा उपदेश, केडगावच्या जैन स्थानकात ३१ दिवसांच्या उपवासांची सांगता
नगर – सध्या सर्वच जण मोठ्या
प्रमाणात आपला वेळ वायफळ
घालवत आहेत. आदर्शवत
जीवनशैलीसाठी काही गोष्टींचा
त्याग करणे आवश्यक आहे.
आपापसात बोलताना कमी बोला,
टीव्ही बघताना काही सिरीयल बघा
तसेच मोबाईलचाही वापर कमी
करा. या गोष्टींचा काही प्रमाणात
त्याग कराच शिवाय जेवनावरही
नियंत्रण ठेवा. जेवढा वेळ तुम्ही
या गोष्टींसाठी देत आहात त्यात
काटछाट करून वाचलेल्या
वेळेत जप, तप व सेवा करा हेच
परमात्माला अपेक्षित आहे, असा
उपदेश साध्वी महासती दिव्यदर्शन
महाराज यांनी केले.
केडगाव येथील जैन श्रावक संघाच्या स्थानकात सुरू
असलेल्या चातुर्मासात सौ. शितल निलेश जांगडा व सौ.
वैशाली दीपक कांकरिया यांनी केलेल्या ३१ दिवसांच्या
उपवासांची पचकावणी (सांगता) नुकतीच साध्वी महासती
दिव्यादर्शन महाराज व महासती पुनितदर्शन महाराज
यांच्या उपस्थितीत झाली. तसेच अकोळनेर येथील
स्थानकातही आदर्शऋषी महाराजांनी सौ. कांकरिया व
सौ.जंगडा यांना आशीर्वाद देऊन त्यांचे कौतुक केले.
उपवासाच्या सांगता निमित्त केडगाव स्थानकाच्या वतीने
दोन्ही महासतींना जेष्ठ नागरिक पनालाल बोकरिया व
केडगाव जैन स्थानकाचे अध्यक्ष अतुल शिंगवी यांच्या
हस्ते विशेष मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी स्थानकाचे सर्व पदाधिकारी, परिसरातील
नागरिक, महिला व युवक उपस्थित होते.
दिव्यदर्शन महाराज यांनी आपण छोट्या छोट्या
कार्यातून कसे चांगले काम व सेवा करू शकतो याचे
विश्लेषण करून सेवेचे महत्त्व सांगितले. त्या म्हणाल्या,
शितल जांगडा व वैशाली कांकरिया यांनी ३१ दिवस
उपवास करून मोठा तप केला आहे. त्यांच्यापासून
सर्व नागरिकांनी प्रेरणा घ्यावी व त्यांच्या प्रमाणे तप
करावा. या साधनेमुळे जीवनामध्ये मोठ्या प्रमाणत बदल
होतात व परमात्माचे आशीर्वाद लाभतात. या दोघींनीही
आपल्या कुटुंबाबरोबरच केडगावची शान वाढवली आहे.
केडगाव जैन स्थानकाच्या सर्व पदाधिकार्यांचे काम
उत्कृष्ट व प्रेरणादायी असून त्यांनी ज्या पद्धतीने या
चतुर्मासाची नियोजन केले आहे ते
कौतुकास्पद आहे. अतुल शिंगवी
यांनी केडगाव मधील युवाशक्ती
धर्म कार्याला जोडली आहे.
प्रास्ताविकात अतुल शिंगवी
म्हणाले, जैन स्थानकाच्या
इतिहासात आजचा दिवस आनंदही
व सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला
आहे. शितल जांगडा व वैशाली
कांकरिया यांनी ३१ दिवस उपवास
करून आदर्श निर्माण केला आहे.
केडगाव जैन स्थानकाच्या विविध
उपक्रमामुळे केडगावमध्ये धार्मिक
वातावरण निर्माण झाले आहे.
या कार्यासाठी समाजातील ज्येष्ठ
व्यक्ती, नागरिक, युवक व महिला
सहकार्य करत सहभागी होत आहेत.
यावेळी ज्येष्ठ नागरिक गणेशमल कांकरिया, पोपटलाल
शिंगवी, फुलचंद चंगेडिया, रत्नमाला चोरडिया, शशिकला
गांधी, राजु धोका, राजू बडेरा, जैन स्थानकाचे उपाध्यक्ष
मयुर चोरडिया, सेक्रेटरी रुपेश गुगळे, सहसेक्रेटरी विपुल
कांकरिया व ललित गुगळे, खजिनदार सोहन बरमेचा,
परेश बलदोटा, रोहन चंगेडिया, कुशल भंडारी, पियुष
बाफना, कमलेश फिरोदिया, दर्शन गांधी, पारस शेटीया,
कमलेश गुंदेचा, राहुल शिंगवी, उमेश बलदोटा, सफल
जैन, सुशील फिरोदिया, निलेश जांगडा, पारस जांगडा,
दिपक कांकरिया, महेश गांधी, यश भंडारी, महावीर
बोरा, महेंद्र बोरा, कमलेश पोखर्णा, गणेश भंडारी, अमित
मेहेर आदींसह नागरिक उपस्थित होते.